Home विदर्भ पोलिसांच्या शासकीय कामात अडचणी प्रकरणी वकीलावर गुन्हा दाखल  वकीलाला पोलिसांनी केलीअमानुष मारहाण...

पोलिसांच्या शासकीय कामात अडचणी प्रकरणी वकीलावर गुन्हा दाखल  वकीलाला पोलिसांनी केलीअमानुष मारहाण  वकिलांची निदर्शने

916
0

राजेंद्र पाटील राऊत

पोलिसांच्या शासकीय कामात अडचणी प्रकरणी वकीलावर गुन्हा दाखल
वकीलाला पोलिसांनी केलीअमानुष मारहाण
वकिलांची निदर्शने

 

 

(चंद्रकांत गायकवाड तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगाव / वाशिम:- ता २३ – पेट्रोलिंग दरम्यान शहरात लॉक डाऊन च्या आदेशाचे उल्लंघन करून
पोलिसांना ऊर्मट भाषेत बोलल्या प्रकरणी शहरातील एका वकिलावर शासकीय कामात अडचणी आणल्या प्रकरणी मालेगाव येथील वकीलावर गुन्हा दाखल करण्यात आला . पोलिसांनी वकिलाला विनाकारण अमानुष मारहाण केली आणि फिर्याद न घेतल्यावरून वकील संघाने आज न्यायालयासमोर एकत्र जमून या घटनेचा निषेध व्यक्त करत तालुका बार कौन्सिल ने ठराव घेतला आहे.
मालेगांव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आधारसिग सरदारसिग सोनोने यांनी फिर्याद दिली की 22 मे रोजी सांयकाळी 6 वा . दरम्यान मा पोलीस अधीक्षक वाशीम हे कोवीड 19 चे लाँक डाऊन बंदोबस्तासाठी मालेगाव येथे भेट देण्या करीता आले होते . त्या दरम्यान आम्ही पेट्रोलीग करीत आलो असता समोरुन एक चार चाकी वाहन आले त्याच क्रमाक एम एच 37 व्ही 2123 हे होता . आम्ही अधीक्षक साहेब व त्याचे पथक असे मालेगाव शहरात जोगदंड हॉस्पीटल पासुन शिव चौकाकडे पैदल पेटोलीग करीत असताना गांधी चौकात सदर वाहनाला थांबलुन त्या व्यक्तीला कोवीड 19 या रोगाचे प्रार्दुभाव रोखण्याचे अनुषंगाने मा जिल्हाधिकारी साहेब वाशीम यानी निर्गमीत केलेल्या लॉकडाऊन आदेशानुसार सध्या संचारबंदी लागू असल्याचे सांगुन बाहेर फिरण्याचे कारणाबाबत विचारना केली असता ऍड सुदर्शन गायकवाड यांनी अंत्यत ऊर्मट भाषेत बोलले . त्यामुळे आम्ही त्यांचेवर कायदेशिर कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले . ज्या कंमाडो पोलीस कर्मचारी यांना वाहनावर कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते . त्या वाहन चालकाने त्या पोलीस कर्मचारी यास गाडी मध्ये बसवुन त्यांचे घरी नागरदास रोडवरील मोठ्या पाण्याचे टाकी जवळ घेवून गेले . त्यावेळेस आरोपीने सहकार्य करण्यास नकार दिला पोलिसांना धक्का बुक्की करुन अश्लील शिवीगाळ करुन दहशत पसरवली . तसेच कोवीड 19 या रोगाचा प्रार्दुभाव रोखण्या करीता मा जिल्हाधीकारी साहेब वाशीम याचे लाकडाऊन आदेशाचे उल्लघन केली यावरून अँड सुदर्शन गायकवाड व त्यांचा मुलगा आदित्य गायकवाड यांचेवर कलम 353.332.186.294.504.188.269.2734 भादवी नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला व अटक केली .
याउलट वकील संघाणे तालुका बार असोसिएशन ने ठराव घेऊन न्यायालयासमोर एकत्र जमून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे ते जिल्हाधिकारी बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा यांना निवेदन पाठवनार आहेत त्यांनी त्यात असे नमूद केले आहे की सुदर्शन गायकवाड हे शेतातून येत असताना त्यांनी पोलिसांच्या ताफ्याला साईड मारून समोर जात असताना ओव्हरटेक का केली म्हणून गाडी पोलीस स्टेशनला लावण्यास सांगीतले तेव्हा गायकवाड यांनी पत्नी कोविड पॉझिटिव्ह आहे तिला दवाखान्यात न्यायचे आहे असे सांगीतले मग पोलिसांनी तु खोट बोलत आहे असे म्हणून एक कमांडो अॅड गायकवाड सोबत दिला . गायकवाड यांनी घरी आल्यावर त्यांच्या गाडीची चावी कमांडोना दिली . मात्र त्यावेळी कमांडो ने बाचाबाची सुरू केली त्याच वेळी ठाणेदार यांच्या स्टाफ सह आले व शिवीगाळ करून मारहाण केली ते सोडवण्यासाठी पत्नी आणि मुले गेले असता त्यांनाही मारहाण केली आणि पोलीस स्टेशन ला नेऊन बसवले आणि तक्रार फाडून टाकुन घेण्यास नकार दिला त्यावेळी विधीज्ञ मंडळ मालेगाव चे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच वाशिम येथील विधीज्ञ मंडळाचे सदस्य व मंगरूळपीर येथील सदस्य हजर होते .

Previous articleमालेगांवात सुपरवायझरचा मृतदेह आढळल्याने खळबळ शंका कुशंकाना उधान!
Next articleदेवमाणूस डॉ निलेश बास्टेवाड, कोरोना रुग्णाचे 3 लाख रुपये बिल माफ करून दाखवले माणुसकीचं दर्शन!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here