• Home
  • नांदेडमध्ये शुभम अनुसयाचे लफडे जगदिशने पाहिले!! जगदिशच्या खुनाचे मग रामायण घडले!!

नांदेडमध्ये शुभम अनुसयाचे लफडे जगदिशने पाहिले!! जगदिशच्या खुनाचे मग रामायण घडले!!

नांदेडमध्ये शुभम अनुसयाचे लफडे जगदिशने पाहिले!! जगदिशच्या खुनाचे मग रामायण घडले!!
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
हणेगाव(ता.26)दोघांचे अनैतिक प्रेम संबंध माहीत झाल्याने कुडली येथील एका तरुणाला जिवंत मारल्याची घटना कुडली शिवारात घडली असता मरखेल पोलिसांनी मोठ्या शिताफीने सदरील तरुणाचा हत्या झाल्याचे निष्पन्न करून मरखेलं ठाणे येथे (ता.26)शुक्रवार रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आले असून दोन जणांना अटक करण्यात आले आहे..
तालुक्यातील कुडली येथील शुभम मोहन चीमलपांडे व अनुसया संतोष गोंदे राहणार कुडली ता. देगलूर या दोघांचा अनैतिक प्रेम संबंध कुडली येथील जगदीश हणमंत जाधव वय 27 वर्ष या तरुणाला माहीत झाल्याने सदरील प्रेमी युगुल यांनी आपल्या पद्धतीने योजना करून तारीख दोन जानेवारी रोजी मध्यरात्री कुडली शिवारात जगदीश यांच्या डोळ्यात मिरचू टाकून गुप्तांगावर तोंडावर व गळ्यावर पाय ठेवून त्याला जिवंत मारून फेकून दिले..जगदीश एक जानेवारी पासून घरी आला नसल्याने त्याच्या वडिलांनी मरखेल ठाणे येथे मुलगा हरवले असल्याचे तक्रार केले पोलिसांनी याचा शोध घेत असताना तारीख 25 जानेवारी रोजी कुडली शिवारात चंदरबाई जाधव यांच्या शेतात एका अनोळखी इसमाचा डोक्याची कवटी व शरीराचे इतर भाग पडले असल्याचे माहीत झाल्याने मरखेल ठाण्याचे पोलिस अधिकारी आदित्य लोणीकर व सर्व सहकारी यांनी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा केले घटना स्थळी पडलेले कपडे,चप्पल यावरून हरवलेला मुलगा जगदीश जाधव असल्याचे नातेवाईक यांना ओळख पटली परंतु सदरील घटना हे हत्या आहे की आत्महत्या यावरून मरखेल पोलिस संभ्रमात होते परंतु तपास अधिकारी पो.उप. नि.अजित बिरादार,पोलिस नाईक इंगोले पाटील,जमादार कणकवली यांनी तपासाचे चक्र फिरवून दोन प्रेमी युगुल यांच्या वर संशय आल्याने त्यांना चौकशी साठी ताब्यात घेतले. त्यांनी सदरील गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास स.पो. नि. श्री आदित्य लोणीकर साहेब करीत आहेत.

anews Banner

Leave A Comment