राजेंद्र पाटील राऊत
पिंपरी विभाग प्रीमियर लीग मध्ये डी जी जाधव स्पोर्ट्स संघ विजेता तर उपविजेता छत्रपती श्री राजे इलेव्हन संघ
कर्जत
विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
कर्जत:- पिंपरी विभागाच्या वतीने 4 गावातील खेळाडू एकत्र करून 8 संघ बनवले गेले होते.ते संघ 8 संघ मालकांनी विकत घेतले होते .या स्पर्धा आयोजित करण्या मागे तरुण वर्ग एकत्र येणे आणि एकता टिकवून ठेवणे हा उद्देश होता.
या प्रीमियर लीग मध्ये डी जी जाधव स्पोर्ट्स,केदारनाथ इलेव्हन, राणा स्पोर्ट्स,ओमकार इलेव्हन, ओवे कॅम्पचा राजा, ए. वी. स्पोर्टस,कुस्वामीनी ज्योती केदारनाथ संघ,छत्रपती श्री राजे इलेव्हन असे आठ संघ होते.या स्पर्धा कै.डी जी जाधव क्रीडानगरी आडोशी (कर्जत) येथे 5 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित केल्या होत्या.या आठ संघामध्ये चुरशीच्या लढत झाल्या. छत्रपती श्री राजे इलेव्हन संघ आणि डी जी जाधव स्पोर्टस या दोन संघामध्ये अंतिम लढत झाली यामध्ये डी जी जाधव स्पोर्ट्स संघ विजेता संघ ठरला आणि उपविजेता छत्रपती श्री राजे इलेव्हन संघ ठरला.पिंपरी प्रीमिअर लीग ची संकल्पना नारायण महाराज यांनी मांडली.ही संकल्पना सुरेन्द्र जाधव(सचिव)यांनी सत्यात उतरवली. नारायण जाधव (अध्यक्ष),सतिश जाधव (उपाध्यक्ष), लक्ष्मण भातोसे (उपाध्यक्ष),संतोष रेवणे (कार्याध्यक्ष),रोहित पवार (सहसचिव), दीपक शिंदे (खजिनदार), संतोष जाधव (स्पर्धाप्रमुख) आणि त्यांचे सहकारी यांनी स्पर्धा संपन्न केल्या.
पारितोषिक वितरण सोहळ्याला कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर चे अध्यक्ष श्री अशोक भाऊ जाधव, आणि माजी सचिव लक्ष्मण भाऊ जाधव व मिलिंद रेवणे पिंपरी विभाग सचिव तथा कोयना क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष श्री.गोविंद जाधव व कोयना क्रिकेट असोसिएशन चे कार्याध्यक्ष श्री.दिपक साळुंखे व कोयना क्रिकेट असोसिएशन चे व पिपरी विभाग प्रीमियर लीग चे सल्लागार संदीप भाऊ साळुंखे,हरींचंद्र भोसले,सुरेश शिंदे ,विश्वास जाधव,ज्ञानेश्वर कदम आणि पिंपरी विभागातील ग्रामस्थ ,तरुण वर्ग उपस्थित होते.या स्पर्धेसाठी समालोचक राम मोरे, सुरेन्द्र जाधव, योगेश अपणकर आणि सुदर्शन जाधव हे उपस्थित होते.