Home पुणे पिंपरी विभाग प्रीमियर लीग मध्ये डी जी जाधव स्पोर्ट्स संघ विजेता तर...

पिंपरी विभाग प्रीमियर लीग मध्ये डी जी जाधव स्पोर्ट्स संघ विजेता तर उपविजेता छत्रपती श्री राजे इलेव्हन संघ 🛑

103
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 पिंपरी विभाग प्रीमियर लीग मध्ये डी जी जाधव स्पोर्ट्स संघ विजेता तर उपविजेता छत्रपती श्री राजे इलेव्हन संघ 🛑
✍️ कर्जत 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

कर्जत:- ⭕पिंपरी विभागाच्या वतीने 4 गावातील खेळाडू एकत्र करून 8 संघ बनवले गेले होते.ते संघ 8 संघ मालकांनी विकत घेतले होते .या स्पर्धा आयोजित करण्या मागे तरुण वर्ग एकत्र येणे आणि एकता टिकवून ठेवणे हा उद्देश होता.

या प्रीमियर लीग मध्ये डी जी जाधव स्पोर्ट्स,केदारनाथ इलेव्हन, राणा स्पोर्ट्स,ओमकार इलेव्हन, ओवे कॅम्पचा राजा, ए. वी. स्पोर्टस,कुस्वामीनी ज्योती केदारनाथ संघ,छत्रपती श्री राजे इलेव्हन असे आठ संघ होते.या स्पर्धा कै.डी जी जाधव क्रीडानगरी आडोशी (कर्जत) येथे 5 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित केल्या होत्या.या आठ संघामध्ये चुरशीच्या लढत झाल्या. छत्रपती श्री राजे इलेव्हन संघ आणि डी जी जाधव स्पोर्टस या दोन संघामध्ये अंतिम लढत झाली यामध्ये डी जी जाधव स्पोर्ट्स संघ विजेता संघ ठरला आणि उपविजेता छत्रपती श्री राजे इलेव्हन संघ ठरला.पिंपरी प्रीमिअर लीग ची संकल्पना नारायण महाराज यांनी मांडली.ही संकल्पना सुरेन्द्र जाधव(सचिव)यांनी सत्यात उतरवली. नारायण जाधव (अध्यक्ष),सतिश जाधव (उपाध्यक्ष), लक्ष्मण भातोसे (उपाध्यक्ष),संतोष रेवणे (कार्याध्यक्ष),रोहित पवार (सहसचिव), दीपक शिंदे (खजिनदार), संतोष जाधव (स्पर्धाप्रमुख) आणि त्यांचे सहकारी यांनी स्पर्धा संपन्न केल्या.

पारितोषिक वितरण सोहळ्याला कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर चे अध्यक्ष श्री अशोक भाऊ जाधव, आणि माजी सचिव लक्ष्मण भाऊ जाधव व मिलिंद रेवणे पिंपरी विभाग सचिव तथा कोयना क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष श्री.गोविंद जाधव व कोयना क्रिकेट असोसिएशन चे कार्याध्यक्ष श्री.दिपक साळुंखे व कोयना क्रिकेट असोसिएशन चे व पिपरी विभाग प्रीमियर लीग चे सल्लागार संदीप भाऊ साळुंखे,हरींचंद्र भोसले,सुरेश शिंदे ,विश्वास जाधव,ज्ञानेश्वर कदम आणि पिंपरी विभागातील ग्रामस्थ ,तरुण वर्ग उपस्थित होते.या स्पर्धेसाठी समालोचक राम मोरे, सुरेन्द्र जाधव, योगेश अपणकर आणि सुदर्शन जाधव हे उपस्थित होते. 🛑

Previous articleदेगलूर तालुक्यातील मौजे केदार कुंठा येथील पॅनल प्रमुख भास्कर पाटील केदारकुंठेकर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड..
Next articleरत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here