• Home
  • लोकशाहीत प्रामाणिक माणसाची किंमत राहिलीच काय…?

लोकशाहीत प्रामाणिक माणसाची किंमत राहिलीच काय…?

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20201010-034457_WhatsApp.jpg

संपादकीय अग्रलेख…!

लोकशाहीत प्रामाणिक माणसाची किंमत राहिलीच काय…?
वाचकहो,
आज महाराष्ट्रातल्या विविध ग्रामपंचायतीचा निकाल ऐकून धक्काच बसला.लोकशाहीत प्रामाणिक माणसाला किंमतच राहिली नाही.हे बघावयास मिळाले.आदर्श गाव पाटोद्याचे नाव संपूर्ण देशपातळीवर पोहचविणा-या भास्करराव पेरे पाटलांच्या पँनलला दारुण पराभव पत्कारावा लागला.हे कशाचे द्योतक म्हणायचे?
प्रामाणिकपणे व इमानदारीने गाव विकासासाठी त्याग करुन खस्ता खाणा-या व्यक्ती या मतदार राजा म्हटल्या जाणाऱ्या नागरिकांना चालतच नाहीत हेच यावरुन सिध्द झाले.
निवडणुका तरी कोण लढतंय ,चोर भामटे लफंगे,वाळू माफीया,रेशन माफीया,अवैध बांधकामे करणारे अतिक्रमण वाढवणारे,लोकांच्या जागा बळकावणारे हेच जर मतदारांच्या नजरेत आँयडाल असतील,तर लोकशाहीत सच्चाई व प्रामाणिकेतला कुठलेच महत्त्व उरणार नाही.आणि मग गावाचा विकास होण्याऐवजी भकासतेकडे गावा गावाची वाटचाल सुरु होईल.कुठे या लोकशाहीचे पावित्र्य नष्ट करण्यासाठी लिलाव होतो,तर कुठे निवडणूकात दलितांना उमेदवारी पासून पध्दतशीरपणे डावलले जाते.हे सगळ काय आहे?
तर निवडणुकांच्या नावाखाली गुंड पुंड वाढवायचे आणि मग त्यांनीच विकासाच्या नावाखाली गावाचे तीनतेरा नऊ बारा वाजवायचे.आज आदर्श गाव म्हणून मिरविणारी बहुतांश गावे अशी आहेत की,तेथे शौचालयाची धड व्यवस्था नाही,पिण्याला मुबलक पुरेसे पाणी नाही,अतिक्रमणाने गावच्या गावे गिळून टाकलीत.मग कुठे आहे विकास?फक्त स्वतःच्या मतलब व स्वार्थासाठी या निवडणूका लढवायच्या मतदार राजा असलेल्या नागरिकांच्या डोळ्यात धुळ फेकून…हा गैरप्रकार ज्या दिवशी थांबेल प्रामाणिकपणे काम करणारी माणस सतेत येतील त्याच दिवशी लोकशाही खरे अर्थाने मोकळा श्वास घेईल.एव्हढेच!

anews Banner

Leave A Comment