Home माझं गाव माझं गा-हाणं ग्रामपंचायत निवडणूकीत संवदगावला युवा मराठाचे प्रतिनिधी जगदिश बागूल यांच्या पत्नी विजयी!

ग्रामपंचायत निवडणूकीत संवदगावला युवा मराठाचे प्रतिनिधी जगदिश बागूल यांच्या पत्नी विजयी!

114
0

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामपंचायत निवडणूकीत संवदगावला युवा मराठाचे प्रतिनिधी जगदिश बागूल यांच्या पत्नी विजयी!
(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव- मालेगांव तालुक्यात अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सवंदगाव ग्रामपंचायत निवडणूकीत युवा मराठा न्युज चँनलचे प्रतिनिधी जगदिश बागूल यांच्या पत्नी सौ.आशाताई बागूल यांचा दणदणीत विजय झाला आहे.
युवा मराठा परिवाराने देवळा तालुक्यात तिसगाव मालेगाव तालुक्यात संवदगाव व कौळाणे (निं.) येथे दिलेले तिघाही उमेदवारांनी आपला विजयाचा कौल राखण्यात व्यशस्वी कामगिरी पार पाडली आहे,
नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य पंकज गायकवाड तिसगांव,सौ.आशाबाई बागूल संवदगाव ,रविंद्र वाघ कौळाणे(नि.) यांचे युवा मराठा न्युज महाराष्ट्र कडून अभिनंदन करण्यात आले असून भावी वाटचालीस शुभकामना बहाल करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here