Home माझं गाव माझं गा-हाणं ग्रामपंचायती पासून ते महानगरपालिकेपर्यंत शिवसेनेचा भगवाच फडकणार

ग्रामपंचायती पासून ते महानगरपालिकेपर्यंत शिवसेनेचा भगवाच फडकणार

86
0

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामपंचायती पासून ते महानगरपालिकेपर्यंत शिवसेनेचा भगवाच फडकणार
प्रतिनिधि= किरण अहिरराव

आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात निवडणुकाची रणनीती ठरवण्यासाठी तातडीची पदाधिकारी बैठकीचे आयोजन कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीला राज्यमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार सुहास कांदे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार अनिल कदम, योगेश घोलप, काशीनाथ मेंगाळ, निर्मलाताई गावित, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, मनपा गटनेते विलास शिंदे, उदय सांगळे, मोहन गांगुर्डे, भास्कर गावित आदी उपस्थित होते. सदर बैठकीच्या सुरवातीला शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नामदार दादाजी भुसे यांची नियुक्ती झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला तसेच विजय करंजकर यांची विधान परिषदेला आमदार म्हणून शिफारस केल्या बद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित नाशिक महानगरप्रमुख पदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. सदर बैठकीचे सूत्रसंचालन विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केले. ग्राम पंचायत, जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात तातडीचे नियोजन राबवण्यात येणार असून गाव, तालुका व शहर या तीनही स्तरावरील शिवसेना पदाधिकाऱ्यांची मंत्री महोदयांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेणार आहेत तसेच संघटनात्मक दृष्ट्या शिवसैनिकांच्या बैठका घेण्याचे सूचना करण्यात आल्या. गेल्या वर्षभरात संपूर्ण जगाला कोरोनाने ग्रासलेले असतांना महाराष्ट्र सरकारने केलेल्या अनेक महत्त्वाच्या उपाय योजना तळागाळातील जनते पर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मीडियाची स्वतंत्र टिम तयार करणार. नामदार दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तालुका निहाय विकास कामांसाठी तालुक्यातील शिष्टमंडळ घेऊन माननीय मुख्यमंत्री व सांबांधित खात्यातील मंत्र्यांना भेटून प्रश्न मार्गी लावणार. जिल्ह्यातील नामदार, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख, विरोधी पक्षनेते हे शिवसेना कार्यालयात ठरवून दिलेल्या दिवशी जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जनता दरबार भरवला जाणार असून शिवसेना पदाधिकाऱ्यांना देखील मार्गदर्शन केले जाईल.

Previous articleसुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल   
Next articleमोटार वाहन निरीक्षक यांचा तालुका शिबिर कार्यालयाचा पुढील प्रमाणे दौरा ..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here