राजेंद्र पाटील राऊत
अखेर कुंटुर पोलिसांनी केले शासनाच्या अपहार प्रकरणातील फरार आरोपी निलंबित ग्रामसेकास जेरबंद
नांदेड, दि.६ – राजेश एन भांगे
दुगाव ग्रामपंचायत कार्यालयातील निलंबित ग्रामसेवक शेषेराव विक्रम कौशल्ले वय ४२ वर्ष रा. उमरा ता. लोहा याच्यावर शासनाच्या अपहार प्रकरणी मागील दीड वर्ष पासून कूंटूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर ४४/२०२० कलम ४२०,४०९ भां द वी. व ९०/२०२० कलम ४२०,४०९ भा द वी. व तसेच कुंडलवाडी पोलीस स्टेशन व नायगांव येथील पोलिस स्टेशन मधील गुन्ह्यात सुद्धा शासनाच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल असून सदर आरोपी हा मागील दिड वर्षा पासून शासनाचा अपहार करून ( शासनाला चुना लाऊन ) पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून फरार होता.
परंतु कळ दिनांक ०५-१२-२०२० रोजी पोलिस स्टेशन कुंटुर ठाण्याचे प्रभारी अधिकारी करीम खान पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक, व दिनेश शिवाजीराव येवले पोलीस उपनिरीक्षक यांना गुप्त खबऱ्या कडून माहिती मिळाली असता सादर आरोपी त्याच्या गावाकडे उमर ता. लोहा येथे येणार असल्याची खात्री लायक माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक करिमखान पठाण सोबतच पो.उ.नी. दिनेश येवले, बिट जमादार पो.ना./शेख अब्दुल बारी,पो. ना. उद्धव कदम,पो. कौ./१८७१ विवेक इश्र्वरे, पो.को. /२३७८ शंकर बुधेवड,चालक पो. हे. को.सदाशिव पाटी यांनी मोजे उमरा येथे तत्काळ दाखल होऊन सापळा रचला व सादर आरोपीस अटक केली आहे.
व तसेच पुढील तपास कुंटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम खान पठाण हे करीत आहेत.