Home Breaking News सटाणा: शिखांचे धर्मगुरू गुरुनानक देव यांची जयंती उत्साहात साजरी

सटाणा: शिखांचे धर्मगुरू गुरुनानक देव यांची जयंती उत्साहात साजरी

213

सटाणा: शिखांचे धर्मगुरू गुरुनानक देव यांची जयंती उत्साहात साजरी सटाणा,(जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– सटाणा शहरातील शिख बांधवांकडून येथिल ताहाराबाद नाक्यावर साजरी करून नानक यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनिल मोरे, मनमाड गुरुद्वाराचे संचालक बाबा रणजीतसिंह, चांदवड गुरुद्वाराचे बंटीसिंह, लालचंद सोनवणे, शिवसेना तालूका प्रमूख सुभाष नंदन, नगरसेवक महेश देवरे, दीपक पाकळे, बिंदूशेठ शर्मा, दत्तूभाऊ बैताडे, किरण मोरे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.

यावेळी बोलतांना बाबा रणजीतसिंह म्हणाले आज सर्वत्र सोशल मिडीया वापर मोठया प्रमाणात सुरू परंतू सोशल मिडीयावर चुकीच्या माहीती टाकून समाजामध्ये अफवा पसरवण्याचे काम अनेक समाजकंटकांडून सुरू आहे. अशा अफवांपासून प्रत्येकाने जागृत रहाण्याची गरज आहे.

यावेळी मोफत पाचशे मास्कचे वाटप उपस्थित पाहूण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाप्रसादही वाटप करण्यात आला. यावेळी राजनसिंह चौधरी, मंगलसिंह जोहरी,भरपूरसिंह पोथिवाल, टिंकू पोथिवाल,करणसिंह पोथिवाल, निटूसिंह भट्टी,भुरासिंह भट्टी, तरुणसिंह भट्टी, संदीपसिंह पोथिवाल, दर्शन पोथिवाल आदींसह महीला व पुरुष वर्ग उपस्थित होते.

Previous article🛑 डिसेंबरमध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद, बँकांना सुट्याच सुट्ट्या 🛑
Next articleपुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी पेठ वडगांव मतदान केंद्रावर चुरशीने मतदान,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.