Home उतर महाराष्ट्र चाळीसगाव तालुक्यातील वीर पुत्र यश देशमुख दहशतवादी हल्यात शहीद*

चाळीसगाव तालुक्यातील वीर पुत्र यश देशमुख दहशतवादी हल्यात शहीद*

125
0

राजेंद्र पाटील राऊत

*चाळीसगाव तालुक्यातील वीर पुत्र यश देशमुख दहशतवादी हल्यात शहीद*

चाळीसगाव,( ब्युरो टिम युवा मराठा न्युज)
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील आणखी एका जवानाला वीरमरण आलं आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील एक जवान शहीद झाले आहेत. काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान शहीद यश दिगंबर देशमुख शहीद झाले असून ते 21 वर्षांचे आहेत.
काल दुपारी 2 वाजता त्यांना वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वी यश हे सैन्यदलात भरती झाले होते. ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलं होतं.
आज दुपारी शत्रूविरोधात लढा देत असताना त्यांना वीरमरण आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
यश देशमुख यांच्या मागे त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असं कुटुंब आहे. त्यांच्या शहीद होण्याची बातमी गावात कळताच सर्वत्र शोककळा पसरली. अद्याप त्यांच्या आई-वडिलांना मुलगा शहीद झाल्याचे सांगण्यात आलेले नाही. यश यांच्या निधनाच्या बातमीनंतर गावात एकही चूक पेटली नसून दहशतवाद्याच्या हल्ल्याचा सर्वांकडून निषेध केला जात आहे.
देशात एकीकडे संविधान दिन साजरा केला जात आहे. मुंबईतील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण होत असतानाच श्रीनगरमधून मोठी बातमी येत आहे. श्रीनगर परिसरात दहशतवाद्यांनी पुन्हा भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. श्रीनगरमधील HMT परिसरात सुरक्षा दलाच्या टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या परिसरात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन जारी असून परिसरात ज्यादा कुमक तैनात करण्यात आली आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.दहशतवाद्यांनी परिमपुरा परिसरातील खुशीपुरा येथे सुरक्षा दलावर गोळीबार केला. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी त्या परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे. या घटनेवर काश्मीरचे आयजी म्हणाले की तीन दहशतवाद्यांनी सैन्याच्या जवानांवर गोळीबार केला. ज्यामध्ये दोन सैनिक गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत ते शहीद झाले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जैशचा हात आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleआदिवासी एकता मंडळ कडून मनोर येथे संविधान दिन व 26/11 हुतात्म्यांना श्रद्धांजली*
Next articleआदिवासींसाठी खावटी अनुदान योजना*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here