Home नांदेड देशातील नागरीकांचा भाजपवर विश्वास :- खा. प्रताप पाटील चिखलीकर पदवीधर मतदारांचा मुखेडात...

देशातील नागरीकांचा भाजपवर विश्वास :- खा. प्रताप पाटील चिखलीकर पदवीधर मतदारांचा मुखेडात भाजपकडून भव्य मेळावा.

108
0

राजेंद्र पाटील राऊत

देशातील नागरीकांचा भाजपवर विश्वास :- खा. प्रताप पाटील चिखलीकर
पदवीधर मतदारांचा मुखेडात भाजपकडून भव्य मेळावा.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड- देशाचे नेतृत्व एका खंबीर हातात असून त्या नेतृत्वावर व भारतीय जनता पक्षावर देशातील नागरिकांनी विश्वास टाकला आहे तो विश्वास दिवसेंदिवस दृढ होत चालला असून आगामी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शिरीष भास्करराव बोराळकर यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुखेड येथे आयोजित पदवीधरांच्या मेळाव्यात केले.
यावेळी आमदार डॉ.तुषार राठोड या भागाचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजूरकर, व्यंकटराव पाटील चांडोळकर,माधवअन्ना साठे, गौतमराव काळे, लक्ष्मण पाटील खैरकेकर,मनोज गोंड, चंद्रकांत गरुडकर,नारायण गायकवाड, नासेर पठाण,रणजीत पाटील हंगरगेकर, माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड, डॉ.माधव पाटील उच्चेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पदवीधर मतदारांना मार्गदर्शन करताना खा. प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, मागच्या निवडणुकीत दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी शिरीष बोराळकर हे विजयी व्हावेत त्यांची इच्छा होती. मात्र ऐनवेळी काळाने घाला घातला व गोपीनाथराव मुंडे आपल्यातून निघून गेले.आता त्यांच्या पश्चात त्यांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी आपण शिरीष बोराळकर यांना पदवीधर मतदारसंघातून विजय करू तसेच पदवीधर मतदारांनी मतदान करताना शिरीष बोराळकर यांना आपल्या पहिल्या पसंतीचे मत देऊन त्यांचा विजय निश्चित करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना आ. डॉ. तुषार राठोड म्हणाले निवडणुकीत शिरिष बोराळकर यांना मुखेड तालुक्यातील सर्वाधिक मतदान मिळाले होते. केवळ काही मतांच्या फरकाने शिरीष बोराळकर यांचा विजय हुकला होता. या विजयाच्या हुलकावणीला मतदारांची चुकीची मतदान पद्धती ही कारणीभूत ठरली होती. यावेळी मतदान करताना काळजीपूर्वक शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मतदान करून त्यांचा विजय निश्चित करा. असे आवाहन त्यांनी यावेळी पदवीधर मतदारांना केले. तसेच मागील दोन वेळा पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आ. सतीश चव्हाण यांनी सरकार दरबारी पदवीधरांचे किती प्रश्न मांडले असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी मोठ्या संख्येने विविध शैक्षणिक संस्थेचे कर्मचारी व पदवीधर मतदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. वीरभद्र हिमगिरे यांनी मांडले.

Previous articleपालघर येथे संविधान दिन उत्साहात साजरा
Next articleयुनियन मजूर कामगार संघटनेचे शिष्टमंडळ भिवंडी तहसील कार्यालयात.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here