• Home
  • *”युवा मराठा”ची सर्वात मोठ्ठी घोषणा* *पत्रकार प्रतिनिधीना देणार एक लाख रुपयाचा अपघाती संरक्षण विमा*

*”युवा मराठा”ची सर्वात मोठ्ठी घोषणा* *पत्रकार प्रतिनिधीना देणार एक लाख रुपयाचा अपघाती संरक्षण विमा*

*”युवा मराठा”ची सर्वात मोठ्ठी घोषणा* *पत्रकार प्रतिनिधीना देणार एक लाख रुपयाचा अपघाती संरक्षण विमा*
मालेगांव,( युवा मराठा न्युज नेटवर्क)- आज दिवाळी सणाच्या पुर्वसंध्येला आयोजीत युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड न्युज चँनलच्या पत्रकार प्रतिनिधी बांधवाच्या झालेल्या विभागीय बैठकीत सगळ्यात मोठ्ठी घोषणा करण्यात आली.
युवा मराठा न्युज चँनलच्या मालेगांव सटाणा देवळा कळवण आणि सुरगाणा भागातील पत्रकारांची विभागीय बैठक आज हरिकेश लाँन्स येथे उत्साहात पार पडली.यावेळी वरील घोषणा करण्यात आली.युवा मराठा न्युज चँनल व वृतपत्रांचे प्रतिनिधी पत्रकारांना वार्ताकन करतेवेळी दुर्दैवाने अपघात होऊन दुर्घटना झाल्यास त्यांच्या कुटूंबियांना युवा मराठा न्युज चँनलच्या ए.बी.एन.मिडीया नेटवर्कच्या माध्यमातून तात्काळ एक लाख रुपयांची रोख मदत केली जाणार असल्याची माहिती मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली.
यावेळी जयवंत धांडे, सुभाष कचवे,दिपक भावसार,पंकज गायकवाड आदिनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या बैठकीस निलेश भोये, कमलेश ठाकरे, जयवंत धांडे, जगदिश बधान, दावल पगारे,निंबा जाधव,गोकुळ दळवी,जगदिश बागुल,बाळासाहेब निकम,युवराज देवरे,किरण अहिरराव,नाना अहिरे, कन्हैयालाल ढोढरे,पंकज गायकवाड ,सुभाष कचवे,दिपक भावसार ,श्रीमती आशाताई बच्छाव, राजेंद्र पवार आदी पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
पत्रकार अपघाती मदत निधी संरक्षण विम्याची सुरुवात १९ फेब्रुवारी २०२१ शिवजयंतीपासून होणार असल्याने अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment