Home Breaking News *जिल्हा परिषदेच्या मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांची पंखाविना भरारी*

*जिल्हा परिषदेच्या मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांची पंखाविना भरारी*

95
0

*जिल्हा परिषदेच्या मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांची पंखाविना भरारी*

*युवा मराठा न्यूज*

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त दिव्यांग, मतिमंद, गतिमंद मुलांच्या शाळांमधील या विशेष मुलांनी दिवाळीसाठी आकर्षक आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या, उटणे, मेणबत्त्या यांच्यासह भेटवस्तू तयार केल्या आहेत. यंदाच्या गिफ्ट पॅकमध्ये साबण-तेलांसोबतच सॅनेटायझरच्या बाटलीचाही समावेश झाला आहे. बनवलेल्या या वस्तुंची विक्री जिल्हा परिषदेच्या आवारात दि.9 ते 11 नोव्हेंबर या तीन दिवसात होणार आहे. या विद्यार्थ्यांची स्पेशल ऑलंपिक, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग पाहून पंखाविना भरारी काय असते ते दाखवून दिले आहे.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्वयम मतिमंद शाळेतील उद्योग केंद्राच्या अध्यक्ष शोभा तावडे यांनी माहिती दिली. या शाळेतील उद्योग केंद्रात 18 वर्षापुढील 56 मुले आहेत. अत्यंत सुंदर पध्दतीने गणेश मूर्ती तयार करतात. वेगवेगळी फुले तयार करतात. दिवाळीसाठी उपयोगी असणाऱ्या वस्तूंचे बॉक्स तयार करण्यात येत आहे. फाईल तयार करण्यात येतात शिवाय पेंटींगचे प्रदर्शनही भरवण्यात येत असते. दुर्लक्षीत असणाऱ्या या मुलांना आमच्या संस्थेमार्फत सक्षम करण्यात येते. या वस्तूंची खरेदी करावी असेही त्या म्हणाल्या. संपर्क- नवीन न्यायालयाच्या मागे, कसबा बावडा, कोल्हापूर. प्रमोद भिसे- 7276051472.
जिज्ञासा विकास मंदिर बौध्दिक अक्षम मुलांच्या शाळेत अत्यंत आकर्षक आकाश कंदीलची निर्मिती होत आहे. या शाळेच्या स्मिता दीक्षित म्हणाल्या, मेणपणत्या मुलं सुंदर रंगवतात. वजनानुसार उटण्याचं पॅकिंग करतात. शिवण विभाग, पाक विभागातही या मुलांना वेगवेगळ्या पध्दतीचं प्रशिक्षण दिलं जातं. मुलांसाठी व्यायामशाळा देखील आहे. मुलांना सतत कार्यरत ठेवलं जातं. या मुलांच्या सुंदर कलाकृती खरेदी करून आपल्या दिवाळीबरोबरच या मुलांच्या दिवाळीचा आनंदही व्दिगुणीत करावा. संपर्क- रघुनंदन हॉल, क्रशर चौक, कोल्हापूर. स्मिता दीक्षित- 9850060903.
चेतना अपंगमती विकास संस्थेचे चेतना विकास मंदिर -कृष्णात चौगुले व्य्वस्थापकीय अधीक्षक- कागदाच्या लगद्यापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या जातात. मुलींसाठी चेतना बजार सुरू केले. तेलाचा घाणा सुरू आहे. 50 हजार पणत्या, 1 हजार डझन आकाश कंदील, 5 हजार लक्ष्मीतपुजन पुडे दिवाळीच्या निमित्ताने विक्री करतो. 13 ते 14 लाखाची उलाढाल यामधून होत असते. यावर्षी लॉकडाऊनमुळे दिवाळीचे साहित्य आम्ही मुलांकडून घरातून करून घेतले आहे. घरातून 25 हजार पणत्या रंगवून आलेल्या आहेत. 200 डझन आकाश कंदील घरातून तयार करून आलेले आहेत. चिमण्यांची घरटी बनवली आहेत. यावेळच्या गिफ्ट बॉक्समध्ये सॅनेटायझरच्या बाटलीचाही आम्ही समावेश केला आहे.
मुख्याध्यापिका उज्वला खेबुडकर – अमित सुतार, केदार देसाई, आशिष सावेकर, ओंकार राणे आणि प्राजक्ता पाटील या खेळाडूंनी स्पेशल ऑलंपिक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी सांकेतिक भाषेत सादर केलेल्या राष्ट्रगीतात शाळेतील 8 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. गोविंद नेहलानी दिग्दर्शित वुई केअर फिल्म फेस्ट यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या चित्रफितीतही चेतनाचा सहभाग राहिला आहे. संपर्क- कुष्ठधाम शेंडापार्क, कोल्हापूर, 0231-2690306/07.
स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद विद्यालय कागल-तृप्ती गायकवाड- मुलांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना व्यवसाय प्रशिक्षणाचे काम दिले जाते. एकूण 25 विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. वेगवेगळ्या सणानिमित्त साहित्य निर्मिती केली जाते. रक्षाबंधनला राख्या तयार केल्या जातात. दिवाळी सणासाठी आकाश कंदील, पणत्या, नक्षीदार मेणपणत्या, सुंदर फुले सद्या तयार करण्यात येत आहेत. मतिमंद मुलं देखील उत्तम पध्दतीने काम करतात हे त्यांच्या वस्तू निर्मितीमधून स्पष्ट झाले आहे. यामधून त्यांना विद्या वेतन मिळते. संपर्क- तृप्ती गायकवाड- 9545159374.
सन्मती मतिमंद विकास केंद्र इचलकरंजी- व्यवसाय अधीक्षक किशोरी शेडबाळे- लिफाफे तयार करणे, बुके तयार करणे, बॉक्स फाईल तयार करणे, पणत्या रंगवणे, गिफ्ट बॉक्स, लक्ष्मीपुजनचा पुडा, रंगीबेरंगी पणत्या आदींचे प्रशिक्षण दिले जाते. शाळेमार्फत काही विद्यार्थ्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. या वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांचा सन्मान करावा. संपर्क- किशोरी शेडबाळे 9096250952.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने ही विशेष मुले पाठीमागे नाहीत हे त्यांनी बनवलेल्या वस्तूंमधून दिसून येते. गरज आहे ती त्यांनी बनवलेल्या वस्तूंना खरेदी करून दिलखुलासपणे दाद देण्याची.

कोल्हापूर जिल्हाप्रतिनिधी .

Previous article*वडगांव शहरात आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते केक एन जाँय शाँपीचे उदघाटन*
Next article*प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे इनामला आश्वासन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here