Home Breaking News *कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग* *डेकोरेशन असोसिएशनचा* *जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा*

*कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग* *डेकोरेशन असोसिएशनचा* *जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा*

118
0

*कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग* *डेकोरेशन असोसिएशनचा* *जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा*

*युवा मराठा न्यूज*

कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊननंतर डबघाईला आलेल्या मंडप, डेकोरेशन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमात पाचशे लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. यासह अन्य मागण्यांकरीता सोमवारी कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.
कोरोनामुळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांशी संबंधित असणारे मंडप, कॅटरिंग, मंगल कार्यालये, बँक्वेट हॉल, डी. जे. साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापन आदी सेवा देणारे लाखो लोक आर्थिक अडचणीत आले आहेत. व्यावसायिक आत्महत्या करत आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ कोल्हापूर जिल्ह्यातील व्यावसायिकांना परवानगी द्यावी, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.
यासाठी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निलोफर आजरेकर , नगरसेविका जयश्री चव्हाण , माजी नगरसेवक सचिन चव्हाण , शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर , महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी , उपमहापौर संजय मोहिते , गटनेते शारंगधर देशमुख , स्थायी समिती सभापती सचिन पाटील ,को .महा.पालिकेचे उपमहापौर संजय मोहीते , जिल्ह्यातील सर्व मंडप व्यावसायिक तसेच पेठ वडगांव व परिसराचे मंडप असोसिएशन चे सर्व पदाधिकारी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पाठींबा दिला. यावेळी एक उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक व शंभरहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोहन शिंदे जिल्हाप्रतिनिधी
कोल्हापूर .

Previous article🛑 उद्यापासून बँकांच्या वेळांमध्ये बदल……! जाणून घ्या काय आहे तुमच्या बँकेची वेळ 🛑
Next article🛑 मराठा विद्यार्थ्यांच्या फिचा भार :- राज्य सरकार उचलणार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here