• Home
  • परतीच्या पावसाच्या दीर्घ विश्रांतीनंतर रब्बी हंगामाच्या पेरणीच्या कामास सुरुवात…

परतीच्या पावसाच्या दीर्घ विश्रांतीनंतर रब्बी हंगामाच्या पेरणीच्या कामास सुरुवात…

परतीच्या पावसाच्या दीर्घ विश्रांतीनंतर रब्बी हंगामाच्या पेरणीच्या कामास सुरुवात… जाहूर ,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील जाहूर परिसरात रब्बी हंगामाच्या पेरणीस सुरुवात झाल्याचे दिसून येत असून यंदा मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशः हैराणकरून सोडले आहे यंदा रब्बी पेरणीस एक महिना उशीर झाला असून रब्बी पेरणी च्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे रब्बी हंगामात दरवर्षी प्रामुख्याने गहू ज्वारी हरभरा जवस करडी इत्यादी पिके घेतली जातात उंदरी पदे येथील शेतकरी गोरख माणिका सोनकांबळे यांनी अगोदरच पेरणीस एक महिना उशीर झाल्याचे सांगितले तब्बल पावसाच्या विश्रांतीनंतर सर्व शेतकरी घाईगडबडीने आपापली पेरणी उरकून घेत असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.

anews Banner

Leave A Comment