• Home
  • 🛑 *पाठी मागून धूर निघतोय सांगितल्यावर थांबली नॅनो कार, काही कळायच्या आता..* 🛑

🛑 *पाठी मागून धूर निघतोय सांगितल्यावर थांबली नॅनो कार, काही कळायच्या आता..* 🛑

🛑 *पाठी मागून धूर निघतोय सांगितल्यावर थांबली नॅनो कार, काही कळायच्या आता..* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕मुंबई बंगळुरू महामार्गावर  बर्निंग कारचा थरार पाहण्यास मिळाला. भरधाव नॅनो कारने अचानक पेट घेतला होता. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबई बंगळुरू महामार्गावर आज दुपारी वारजेजवळ ही घटना घडली. साताऱ्याहून एक कुटुंब टाटा नॅनो कारने मुंबईच्या दिशेनं जात होते. वारजे पुलाजवळ ही कार पोहोचली असता नॅनो कारच्या पाठीमागून धूर येत होता. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या एका कारचालकाने गाडी थांबवण्यास सांगितले.

त्यामुळे नॅनो कारमधील पती, पत्नी, दोन मुलं गाडीतून लगेचच उतरले. काय घडले नेमके याची पाहणी करत असताना अचानक कारने पेट घेतला. आणि काही क्षणांत आगीच भडका उडाला. वेळीच कारमधील कुटुंब बाहेर पडल्यामुळे अगदी थोडक्यात त्यांचा जीव वाचला.

स्थानिक लोकांनी कारला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना अपयश आले.
नॅनो कारला आग लागल्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पण, तोपर्यंत नॅनो कारही पूर्णपणे जळून खाक झाली आहे….⭕

anews Banner

Leave A Comment