Home Breaking News *”गाढव मोर्चाच्या धास्तीने SBI बँक नरमली”*

*”गाढव मोर्चाच्या धास्तीने SBI बँक नरमली”*

91
0

*”गाढव मोर्चाच्या धास्तीने SBI बँक नरमली”*
*शेतकरी पुञ आंदोलकांच्या मागण्या सहायक पोलीस निरीक्षक कमलाकरजी गड्डीमे सरांच्या मध्यस्थीने मान्य केल्याने गाढव मोर्चा तुर्तास स्थगित*   जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्टेट बँक आँफ इंडीया शाखा बार्‍हाळी शाखेच्या मनमानी कारभारा विरुध्द बार्‍हाळी शाखेवर बुधवारी गाढव मोर्चा आयोजीत करण्यात आला हौता.पण मुक्रामाबाद पोलीस स्टेशनचे स.पोलीस निरीक्षक कमलाकरजी गड्डीमे सर व पोलीस ऊपनिरीक्षक गोपीनाथजी वाघमारे सर यांच्यामार्फत स्टेट बँक आँफ इंडीया बार्‍हाळीचे शाखाधिकारी रुषिकुमार यांनी बार्‍हाळी पोलीस चौकीत येवुन आंदोलक शेतकरी पुञांशी बालाजी पाटील ढोसणे,बालाजी पाटील सांगवीकर,रमाकांत पाटील जाहुरकर,व निळकंठ पाटील कोळनुरकर या शेतकरी पुञांशी चर्चा करुन आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्या संदर्भात लेखी आश्वासन दिले यावेळी पञकार केशव रापतवार सर,नरसिंग अस्वले सर,गणेश जाधव सर,संपत गायकवाड सर ऊपस्थितीत होते.व निवेदन दिल्या बरोबर बँकेतील ७० टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा करण्याचे काम व कर्जमंजुरीचे फाईल निकालीचे काम गाढव मोर्चाच्या धसकीने पुर्ण झाले व राहीलेले काम दहा दिवसात पुर्ण करण्याचे आश्वासन शाखाधिकार्‍यांने दिले.बँकेत दलालांच्या विरुध्द ठळक अक्षरात मराठी मधुन नोटीस फलक लावण्यात आले.एटीएम मशीन व पासबुक प्रिंट मशीन बाहेर बसवण्यासाठी तात्काळ RBO ला पञ पाठविले व तसेच आंदोलकास कळविले व सिएसपी लुट संर्दभात बार्‍हाळी शाखेतील खातेदारांना एकही रुपये सिएसपी वाल्यांना देण्याची गरज नसुन ते मागणी करीत असल्यास शाखाधिकारी किंवा शेतकरी पुञांशी संर्पक साधावा तात्काळ त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल असे सांगीतले व दलाली संर्दभात कुणालाही एकही रुपये न देता शाखाधिकारी किंवा शेतकरी पुञांशी संर्पक साधावा व या मागण्या संर्दभात लेखी पञ देवुन आंदोलकांना मध्यस्थी घडवुन शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम वर्दीतला देव माणुस API कमलाकरजी गड्डीमे सर व PSI गोपीनाथजी वाघमारे सरांनी केले व याबाबतीत सदैव आंदोलकांच्या संर्पकात व बँक व आंदोलकात समन्वय साधला ते गोपनीय शाखेचे केंद्रे सर व माधव जळकोटै सर व नरेंद्रजी यल्लावार सर यांनी व यानंतरही बँकेत जर अडचण असली तर तात्काळ शेतकरी पुञाशी संर्पक साधावा असे आवाहन यावेळी शेतकरी पुञ आंदोलक बालाजी पाटील ढोसणे,बालाजी पाटील सांगवीकर,रमाकांत पाटील जाहुरकर,निळकंठ पाटील कोळनुरकर,मन्मथ खंकरे हे ऊपस्थितीत होते.

Previous article*युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
Next articleमुखेड तालुक्यातील शेतकरी परतीच्या पावसाने पुन्हा संकटात !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here