Home Breaking News अमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनीला मनसेचा इशारा

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनीला मनसेचा इशारा

189

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनीला मनसेचा इशारा

नांदेड, दि.१८ – राजेश एन भांगे

अमेझॉन आणि फ्लीप कार्ड
अॅपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करा.
अन्यथा दिवाळीचा सण मनसे स्टाइल साजरा करण्यात येईल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ड या दोन कंपन्यांना सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे. सात दिवसाच्या आत जर त्यांनी त्यांच्या अॅप मध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव केला नाही तर त्यांचा मनसे स्टाइल समाचार घेण्यात येईल, असा इशारा मनसेले दिला आहे. ज्याप्रमाणे या कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य देऊन तिथे त्यांच्या भाषेत ॲप सुरू केले, तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत ॲप आणावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा दिवाळीचा सण मनसे स्टाईल साजरा करेल.असा इशारा दिला आहे.

कामगार सेनेचे सचिन गोळे यांनी देखील अमेझॉनला माफी मागण्यास सांगितले होते ! आणि मराठी भाषा समाविष्ट करण्यासाठी आठवड्याची मुदत देखील दिली आहे !

अखिल चित्रे यांनी देखील अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ला खळखट्याक चा इशारा दिला आहे.

Previous articleखासदार असावा तर ओम दादा सारखा
Next article🛑 कंगना राणावत विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.