• Home
  • 🛑 कंगना राणावत विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल 🛑

🛑 कंगना राणावत विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल 🛑

🛑 कंगना राणावत विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. वांद्र कोर्टाने अभिनेत्री कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करा, असे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. कंगनावर बॉलिवूडमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे वांद्र कोर्टाने मुंबई पोलिसांना कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

तसेच या व्यक्तीने कोर्टासमोर कंगनाचे सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि ट्विट्स देखील सादर केले होते. या सर्व गोष्टींचा तपास करून वांद्रे कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे.

एफआयआर दाखल झाल्यानंतर कंगनाची चौकशी होण्याची शक्यता असून तिच्या विरोधात पुरावे मिळाले तर कंगनाला अटक होण्याची देखील शक्यता आहे.

दरम्यान वांद्रे कोर्टाचे आदेश असल्यामुळे मुंबई पोलिसांना कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल करून घ्यावा लागेल, असे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह एका मराठी वृत्तवाहिनीशी बातचित करताना म्हणाले….⭕

anews Banner

Leave A Comment