आमदार सुहास कांदेचा मतदार संघात दौरा निमगांव(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-*मागील हप्त्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असुन ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी आमदार सुहासआण्णा कांदे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत शेतक-यांशी संवाद साधत आहेत.* तालुक्यातील शेती पिकांचे झालेले नुकसान सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. शेतक-यांना या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनस्तरावर आम्ही प्रयत्नशील असून ही सर्व परिस्थिती सरकारच्याही निदर्शनास आणून देत असल्याचे नांदगाव मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील निंबायती या गावातील शिवारांची पाहणी करतेवेळी आमदारांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांची गंभीर दखल घेत त्यांना धीर देत जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देखिल आमदारांनी कृषि विभागाला दिलेत.