• Home
  • *सकल मराठा समाजाचे पालमंत्र्यांना आणि आमदारनां निवेदन*

*सकल मराठा समाजाचे पालमंत्र्यांना आणि आमदारनां निवेदन*

*सकल मराठा समाजाचे पालमंत्र्यांना आणि आमदारनां निवेदन*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार सतेज उर्फ बंटी पाटील व हातकणंगले तालुक्याचे आमदार राजू बाबा आवळे यांना मराठा समाज आरक्षण स्तगिती बाबत निवेदन देण्यात आले.
मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्तगिती देऊन मराठा समाजाचा हक्क हिरावून गेला असल्याने यास सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध नोंदवला आहे.या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने संपूर्ण मराठा समाज भयंकर अडचणीत आला आहे.

आपण व आपल्या सरकार मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा होऊन मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा.
आरक्षण न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला .
यावेळी हातकणंगले तालुक्याचे आमदार मा. राजूबाबा आवळे साहेब व पेठ वडगांव सकल मराठा समाजाचे विजयसिंह शिंदे , डाँ.अभय यादव , सचिन पाटील , संभाजी भोसले , धनाजी केर्लेकर , आदी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment