• Home
  • *गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांना निवेदन देऊन दोषी पोलीस* *अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी*

*गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांना निवेदन देऊन दोषी पोलीस* *अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी*

*गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांना निवेदन देऊन दोषी पोलीस* *अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर परिसरातील एका युवतीवर
दि.६ सप्टेंबर रोजी वारणानगर परिसरातील युवतीवर लैंगिक अत्याचार करून पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न झाला होता.
या बाबत पेठ वडगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलीस कर्मचारी अमरसिंह पावरा यांनी सदर घटणेत जाणीवपूर्वक बदल केला आहे. मात्र तिला धमकी दिल्या बाबत जबाब नोंदवला गेला आहे.
पिडीत युवतीला आणि नातेवाईकांना रविवारी दुपारी ३ वाजलेपासुन दुसऱ्या दिवशी पहाटे पर्यंत ताटकळत ठेऊन माणसिक खच्फिचीकरण करून फिर्यादीस माणसिक आधार देण्याऐवजी पिडीत युवतीच्या वडिलांना बोलवून आपली मुलगी ‘ द्याय घ्यायची आहे ‘ प्रकरण वाढवू नका असे बोलून पोलीस अधिकाराचा गैर वापर करण्यात आला. परंतु घटणेच्या वस्तूस्तीथीपर्यंत न जाता प्रकरण दडपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला.
पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना वारवांर आग्रह करूनसुद्धा दखल नघेता उलटपक्षी स्टंट करून सर्वासमोर काम बंद करून पोलीस ठाणेसोडून जाणेचे नाटक केले .
सदरची बाब निंदनीय असुन सदर दोषी पोलीस अधिकारी प्रदिप काळे , व पोलीस कर्मचारी अमरसिंह पावरा यांच्यावर कडक कारवाई होणेबाबत विणंती व पिडीत युवतीला न्याय देण्याच्या अनुषंगाने उचित अशी सत्वर कारवाई करून पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करून पंधरा दिवसाच्या आत खातेनिहाय चौकशी न झाल्यास अन्यथा पेठ वडगांव ते गृहराज्यमंत्री यांच्या निवास्थानापर्यंत हजारो च्या संखेत लाँगमार्च काढून सदर घटणेचा निषेध नोंदवण्यात येईल असा इशारा देण्यात आले.
यावेळी प्राध्यापक शरद कांबळे , अश्वजित कांबळे , संदीप कांबळे , विकास कांबळे , मिलींद सनदी सर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment