*अजमिर सौंदाणेच्या शाळेला नागरिकांकडून साहित्य भेट* सटाणा, (जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- जिल्हा परिषद शाळा अजमिर सौंदाने शाळेत आदिवासी मुलांची संख्या जास्त असल्याने सर्व विद्यार्थि यांचे कड़े स्क्रिन टच मोबाइल नसल्याने शाळा व्यवस्थापन समिति व मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाने या मुलांनी शिक्षनापासुन वंचित राहु नये म्हणून आपापल्या संप्रकातील नागरिकांकडे लागणारे साधन देंनगी म्हणुन मागणी केले असता गावातील कै. घमन रतन पगार यांचे स्मरणार्थ श्री.दादाजी घमन पगार तसेच कै. दर्यावसिंग अण्णा प्रतापसिंह पवार यांचे स्मरणार्थ चि.यशोदिप व लौकिक पवार यांनी शाळेला दूरदर्शन संच भेट दिला. तसेच शालेय आवारात विविध प्रकारची 101 फलझाड़े लावण्यात आली या प्रसंगी मुख्यध्यपक पगार सर, भामरे सर, विधाते सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शाळा व्यवस्था पण समिति अध्यक्ष जगदिश बधान, दिपक रायसिंह पवार,महारु देवरे, दादाजी घमन पगार, लौकिक पवार, आदि उपस्थित होते यावेळी देंणगीदार बंधु चे शाळे च्या वतीने आभार मानन्यत आले.