*तुकाराम मुंढे यांची बदली होताच नागपुरात फरक*✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर, आज सकाळी नवे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे मुंढे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार सोपवला.मात्र, शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे आता महापालिकेचे आयुक्त नाही या भावनेनं अनेक अधिकारी आणि कर्मचारी आज महापालिकेत कार्यालयीन वेळेपेक्षा उशीरा आले.
तसंच, तुकाराम मुंढेंच्या सात महिन्याच्या कार्यकाळात असलेले सुरक्षा रक्षक ही आज गायब होते. एकूणच,मुंढेंची पाठ वळताच महापालिकेत पुन्हा बेशिस्तपणा दिसू लागला आहे.
तुकाराम मुंढेंनंतर आता राधाकृष्णन बी नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारत आहेत.