• Home
  • *आर.के.टी.एम. मराठा बाँईज ,* *फ्रेन्डस् ग्रूप या संयुक्त मंडळाने* *जपली सामाजिक बांधिलकी.*

*आर.के.टी.एम. मराठा बाँईज ,* *फ्रेन्डस् ग्रूप या संयुक्त मंडळाने* *जपली सामाजिक बांधिलकी.*

*आर.के.टी.एम. मराठा बाँईज ,* *फ्रेन्डस् ग्रूप या संयुक्त मंडळाने*
*जपली सामाजिक बांधिलकी.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सार्वजनिक ठिकाणी गणेश मुर्ती विसर्जना बंदी असलेने . आज होणाऱ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाला पेठ वडगांव मधील पानमळा , आणि मराठा नगर परिसरातील नागरिकांनी गणेश मूर्ती विसर्जनासाठी मराठा नगर च्या प्रवेशद्वाराजवळ कृत्रिम कुंड तयार केलेले आहे तसेच सँनीटायझर बुथ उभा केले . ह्या कार्यक्रमाचे संयोजक रामकृष्ण तरूण मंडळ , मराठा बाँईज , फ्रेन्डस् ग्रूप
त्या ठिकाणी बाप्पाचे विसर्जन चांगल्या पद्धतीने सुरू आहे. विसर्जनाला बाहेर पडताना नागरिकांनी घरातील सशक्त व्यक्ती जसे तरुण युवक असतील यांनीच बाहेर पडावे वयस्कर लोकांनी अथवा लहान बालकांनी घरातून बाहेर पडू नये गर्दी होईल असा प्रसंग विसर्जना वेळी टाळावा व त्यापासून लांब रहावे व तशी परिस्थिती उद्धभवली तर वेळ पाहून मूर्ती विसर्जनासाठी यावे असे आवाहन आर.के.टी.एम . आणि अक्षय भोसले युवा मंच यांनी केले आहे. पेठ वडगांव शहर परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विसर्जन करताना सँनिटायझर बुथमधुन प्रवेश करूनच गणपती विसर्जनाचे नियोजन केले आहे . अशा पद्धतीने उपाययोजना करण्यात आली आहे.
आर.के.टी.एम. , मराठा बाँईज , फ्रेन्डंस् ग्रूप , या संयुक्त मंडळाने मुर्ती दान करून घेण्याचे उत्कृष्ट नियोजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

anews Banner

Leave A Comment