Home Breaking News *खासदार नवनीत राणानां श्वसनाचा* *त्रास*

*खासदार नवनीत राणानां श्वसनाचा* *त्रास*

90
0

*खासदार नवनीत राणानां श्वसनाचा* *त्रास*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती आणखीच बिघडल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ नागपूरवरून मुंबईला उपचारासाठी रवाना करण्यात आलं आहे. काही दिवसांपुर्वी खासदार नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली होती.
त्यामुळे त्यांना उपचारासाठी अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना तात्काळ नागपूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नागपुरात अधिकच प्रकृती बिघडल्यानं तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं आता त्यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे.

Previous articleकोडोलीत कोविड रूग्णालय सुरू.
Next article*कोरोना योद्धा एक आदर्श* *व्यक्तीमत्व*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here