Home Breaking News कोडोलीत कोविड रूग्णालय सुरू.

कोडोलीत कोविड रूग्णालय सुरू.

137
0

कोडोलीत कोविड रूग्णालय सुरू.

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)
पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलमार्फत कोरोनाच्या लढाईत सामाजिक उत्तरदायित्व जपत  ग्रामीण भागातील जनतेसाठी कोडोली येथे सुरु केलेले कोवीड हॉस्पिटल पन्हाळा तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे. रुग्णसेवा, समाजहित व सामान्य रुग्णाला डोळ्यासमोर ठेवून कोडोली येथे यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलमार्फत सुरु करण्यात आलेल्या कोव्हिड हॉस्पिटलमधून सामान्य रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळणार आहे. या कोव्हिड हॉस्पिटलसाठी शासनामार्फत व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज दिली.
यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलमार्फत कोडोली (ता. पन्हाळा) येथे परिसरातील कोरोना रुग्णांसाठी सुरु केलेल्या  शंभर बेडच्या कोव्हिड रुग्णालयाचे उदघाटन श्री. यड्रावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होत कार्यक्रमास प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील, प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमास उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात प्रशासनामार्फत प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पीटल बेड व्यवस्थापन, डॉक्टर नियोजन या बाबींना प्राधान्य दिले आहे. या हॉस्पिटलसाठी शासनामार्फत सर्व सहकार्य केले जाईल. कोरोना चाचण्या वाढवून  पन्हाळा तालुका कोरोना मुक्त करण्याबरोबरच पन्हाळा तालुक्यात आरोग्याच्या सर्व सुविधा युद्ध पातळीवर राबिवण्यात येतील असेही राज्यमंत्री श्री. यड्रावकर  म्हणाले.
सामान्य माणसाला आरोग्य सेवा मिळावी या दृष्टिने  कोडोली येथे उभारण्यात आलेल्या हॉस्पिटला शुभेच्छा देऊन राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलचा आदर्श घेऊन  जिल्ह्यातील  वैद्यकीय महाविद्यालये व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी  आपापल्या भागात अशी  हॉस्पिटल उभे केल्यास शासनामार्फत त्यांना सर्व सहकार्य केले जाईल.
पालकमंत्री श्री. सतेज पाटील यांनी या कार्यक्रमास व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णांना  त्वरीत सेवा मिळावी यासाठी यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलमार्फत सुरु केलेले कोव्हिड हॉस्पिटल हे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेसाठी एक आदर्शच आहे.  ग्रामीण भागातील विशेषत: पन्हाळा तालुक्यातील कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी हे कोव्हिड हॉस्पिटल वरदायी ठरेल. शंभर खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये  शासनामार्फत व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जाईल.
सचिव डॉ. जयंत पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना उपचार मिळावेत या उद्देशाने हे कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे.  संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये  40 बेड ऑक्सिजनचे आहेत. रुग्णालयामध्ये एक व्हेंटिलेटर उपलब्ध असून शासनामार्फत हॉस्पिटलसाठी आणखी व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना सकस आहार, आयुर्वेदिक काढा देण्यात येणार आहे. रुग्णांकडून योगासने व व्यायाम करुन घेतला जाणार असून स्वच्छ हवेसाठी रुग्णालयामध्ये तुळशीची रोपे ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले यांनी केले. यावेळी कोडोली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास अभिवंत, केखले प्राथमिक आरोग्य केंद्राचे शंकर पाटील, डॉ. सूर्यकिरण वाघ, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांच्यासह परिसरतील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अभिजित इंगवले यांनी केले.

Previous article*हरणबारी धरण भरले तुडूंब* *लाभक्षेत्रातील गावाना होणार फायदा*
Next article*खासदार नवनीत राणानां श्वसनाचा* *त्रास*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here