• Home
  • 🔴 *कोरोना ब्रेकिंग* 🔴 *वाठार मधे दहाजन पाँझिटीव्ह*

🔴 *कोरोना ब्रेकिंग* 🔴 *वाठार मधे दहाजन पाँझिटीव्ह*

🔴 *कोरोना ब्रेकिंग* 🔴
*वाठार मधे दहाजन पाँझिटीव्ह*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

हातकणंगले तालुक्यातील पुणा बेंगलोर हायवे लगत असलेले
वाठार तर्फ वडगांव मध्ये आज दहा जण कोरोणा पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आले आहेत .
दोनच दिवसांपूर्वी ज्या व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता,
आज त्यांच्याच घरातील पाच जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
दुसऱ्या एका घरातील चार जणांचे  आज कोरोणा रिपोर्ट  पॉझिटिव्ह आले आहेत, अजून एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे,
असे एकूण दहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत .
तसेच त्यांच्या घरातील व त्याच्या संपर्कात आले होते, त्याच्या संपर्कातील सगळ्यांना काँरनटाईन करण्यात आले आहे.
त्या भागातील परिसर प्रतिंबध करण्यात आले आहे.
गावातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पंधरा झाली आहे. त्या भागांमध्ये ग्रामपंचायत तर्फे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे .
गावामधे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

anews Banner

Leave A Comment