Home Breaking News केरळ विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला...

केरळ विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव –

100
0

केरळ विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव –

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, ८ – केरळमधल्या कोझिकोड विमातळवर एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात (Air India Express Crash) झाला आहे. या भयंकर अपघातात वैमानिकासह 3 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. तर 32 जण जखमी झाले आहेत. अपघातात जीव गमावलेले पायलट दीपक वसंत साठे हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. ते NDA मध्ये कार्यरत होते.विमान धावपट्टीवर उतरत होतं, तेव्हा प्रचंड पाऊस सुरू होता. केरळमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस सुरू आहे. धावपट्टीवरून विमान घसरलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. याच अपघातात दीपक साठे या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा मृत्यू झाला.
एअर इंडियाचं हविमान रनवेवरून घसरलं असून विमानाला मोठ नुकसान झालं आहे. या विमानात 170 प्रवासी होते. दुबईहून हे विमान कोझीकोडला आलं होतं. IX 1344 हे विमान होतं. कोझिकोड इथे धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. ‘वंदे भारत मिशन’च्या अंतर्गत हे विमान दुबईहून भारतात येत होतं.
दरम्यान, कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे. त्यामुळे इथे विमान उतरत असताना धावपट्टीवर खूपच काळजीपूर्वक उतरवावं लागतं. त्यात इथे पाऊस होता. त्यामुळे कदाचित पायलटला अंदाज आला नसावा. त्यामुळे 30 फूट खाली ते घसरलं आणि त्यातून हा अपघात झाला.

Previous article🔴 *कोरोना ब्रेकिंग* 🔴 *वाठार मधे दहाजन पाँझिटीव्ह*
Next articleमहिलांनो सावधान, दुरूस्तीसाठी दिलेल्या मोबाईल मधिल डाटा चोरून मेकॕनिकनेच केले ब्लॕकमेल –
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here