• Home
  • 🛑 कोविड दक्षता समित्यांनी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करावी…..! पालकमंत्री डॉ .नितीन राऊत 🛑

🛑 कोविड दक्षता समित्यांनी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करावी…..! पालकमंत्री डॉ .नितीन राऊत 🛑

🛑 कोविड दक्षता समित्यांनी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करावी…..! पालकमंत्री डॉ .नितीन राऊत 🛑
✍️नागपूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नागपूर :⭕कोविड-19 चा वाढता प्रसार पाहता लोकांनी न घाबरता स्वत:हून चाचण्या करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या शांतता समित्यांनी कोविड दक्षता समिती म्हणून काम करावे असे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज सांगीतले .

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हयातील कोविड -19 चा वाढता प्रसार पाहता रुग्णांना बेडसह आवश्यक सुविधा मिळाल्या पाहिजे. प्रशासन व आरोग्य विभागासह यंत्रणा उत्तम काम करत आहे. मात्र नागरिकांमध्ये कोविडविषयी भीती किंवा दुर्लक्षाचे वातावरण दिसून येते. ते टाळण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून पुढे येवुन चाचणी करुन घेणे गरजेचे आहे.

संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चाचणी व योग्य उपचार वेळेत मिळणे गरजेचे आहे. दक्षता समितीच्या सदस्यांनी कोविड तपासणीसाठी नागरिकांना प्रोत्साहीत केल्यास प्रसारावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल. पोलीस दलातील काही अधिकारी- कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असुन ही चिंतेची बाब आहे. पोलिसांसाठी कोविड समर्पित रुग्णालय उभारण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ.भुषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपसंचालक डॉ.संजय जायस्वाल, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया, शासकीय वैद्यकीय महाविदयालयाचे डॉ.फजल, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.देवेन्र्द पातुरकर उपस्थित होते.

कोरोनाबाधित रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो येथे आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांबद्ल नागरिकांना माहिती देण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष तयार करावेत.

शहरातील तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा देतांनाच जिल्हयाचा मृत्युदर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्लाझ्मा बॅक तयार करण्यासाठी दात्यांना प्रोत्साहीत करण्यात यावे.

बाजारात किंवा दुकानात होणारी गर्दी पाहता रिक्षाव्दारे जागृती करण्यात यावी. या संदर्भात सर्व वैद्यकीय संघटनांशी देखील चर्चा करण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगीतले…..⭕ळृ

anews Banner

Leave A Comment