Home Breaking News *मेंढपाळावर होत असलेल्या हल्ल्याबाबत यशवंत सेने तर्फे आज नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*मेंढपाळावर होत असलेल्या हल्ल्याबाबत यशवंत सेने तर्फे आज नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

176

*मेंढपाळावर होत असलेल्या हल्ल्याबाबत यशवंत सेने तर्फे आज नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)
✍️यशवंत सेनेतर्फे मा.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
राज्याच्या विविध भागात मेंढपाळावर होत असलेल्या हल्ल्याबाबत यशवंत सेने तर्फे आज नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मागील महिन्यात कुकडी ता.पारनेर जिल्हा अहमदनगर येथील मेंढपाळ व त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना मारहाणीचे प्रकरणाची शाई सुकते न सुकते तोच पाटस ता.दौड जिल्हा पुणे येथे मेंढपाळाला मारहाण झाली. मागील काही महिन्यांपासुण राज्यात लातूर, सोलापूर, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, पुणे,बुलढाणा जिल्ह्यात मेंढपाळांना मारहाणीचे प्रकार वाढत आहेत.
सदर मारहाणीच्या घटना लवकरात लवकर थांबवल्या नाहीतर यशवंत सेना उग्र आंदोलन उभे करेल व त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल असा निर्वाणीचा इशारा निवेदनात देण्यात आला.
याप्रसंगी यशवंत सेनेचे प्रदेश महासचिव मा.खंडेराव पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रमुख सौ.संगिताताई पाटील,जिल्हा अध्यक्ष अरुणदादा शिरोळे, शहर अध्यक्ष श्री.रतन हिरे,श्री.सदाशिव वाघ,श्री.विनायक काळदाते,ज्ञानेश्वर ढेपले आदी उपस्थित होते.
मा.जिल्हाधिकाऱ्यातर्फे उपजिल्हाधिकारी श्री.दत्तप्रसाद नडे यांनी निवेदन स्विकारले व योग्य पाउल उचलन्याचे आश्वासन दिले.

Previous articleनांदगांव हत्याकांड ब्रेकिंग : हत्येपूर्वी महिलेवर अत्याचार झाल्याचा ग्रामस्थांचा संशय.. होणार महत्वपूर्ण खुलासा
Next articleदहीवड ग्रामपंचायतीने घेतला निर्णय : खलील प्रमाणे राहणार मजुरांची मजुरीचा दर*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.