Home Breaking News *शासकीय रिपोर्ट पॉजिटिव्ह तर खाजगी लॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह: नेमका हा बनवा बनविचा...

*शासकीय रिपोर्ट पॉजिटिव्ह तर खाजगी लॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह: नेमका हा बनवा बनविचा घोळ काय?*

136
0

*शासकीय रिपोर्ट पॉजिटिव्ह तर खाजगी लॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह: नेमका हा बनवा बनविचा घोळ काय?*✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

सागर दगा कांदळकर गाव-लखमापूर तालुका-सटाणा (नाशिक) या सदर व्यक्तीचा कॉरोना रिपोर्ट मध्ये मोठा घोळ पहावयास मिळला.
संपुर्ण माहिती अशी आहे की सदर व्यक्ती सागर कांदळकर हा काही कामा निमित्ताने बाहेर गेला असता तो घरी परत आला व त्याला थोडा थकवा जाणऊ लागल्याने सदर व्यक्ती हा लखमापूर येथील डॉ. सोनवणे यांच्या कडे तपासणी साठी गेला असता डॉक्टरांनी सांगितले की तुमच्यात कॉरोना चे लक्षण दिसत आहेत म्हणून डॉक्टरांनी कॉरोना चाचणी करण्यास सांगितले.
सदर व्यक्ती सागरने २९ जुलै रोजी आपले सॅम्पल कोविडं सेंटर अजमिर सौंदाणे येथे पाठवले असता तेथील सागर चा रिपोर्ट पोजिटिव्ह आला व सागर यास सौंदाने कोविडं सेंटर ला दाखल करण्यात आले.
सदर व्यक्तीस बरे वाटू लागल्याने त्याच्या मनात शंका आली की आपल्याला खरच कॉरोना जाला आहे की नाही म्हणून सागरने १ ऑगस्ट ला आपले सॅम्पल हे मालगोव येथील खाजगी लॅब मध्ये पाठविले असता मालेगाव येथील खाजगी लॅबचा रिपोर्ट चक्क आज ३ ऑगस्ट रोजी निगेटिव्ह आला.
या शासकीय रिपोर्टच्या घोळामुळे सदर व्यक्तीचे मोठे नुकसान झाल्याचं त्याच म्हणने आहे कारण त्याचा दुधाचा व मोबाईल दुकानाचा व्यवसाय आहे रिपोर्ट पोजिटिव्ह आल्याने हा व्यवसाय सात दिवसांपासून बंद आहे म्हणून एक लाखाचे नुकसान झाल्याचा त्याचा दावा आहे
हा कॉरोना रिपोर्ट चा घोळ नेमका आहे तरी काय?अशी चर्चा सर्वत्र आता सुरू झाली आहे.

Previous article*कुंटुर पोलिस ठाण्याचे सपोनि के.एस.पठाण यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक -*
Next article*एस.टी.कर्मचारी संयुक्त कृति समितीच्या वतीने आमदार ,प्रांताधिकारी यांना निवेदन.*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here