• Home
  • 🛑 *छावा प्रतिष्ठान रत्नागिरी…..! तर्फे स्वच्छता मोहीम* 🛑

🛑 *छावा प्रतिष्ठान रत्नागिरी…..! तर्फे स्वच्छता मोहीम* 🛑

🛑 *छावा प्रतिष्ठान रत्नागिरी…..! तर्फे स्वच्छता मोहीम* 🛑
✍️रत्नागिरी:( विजय वसंतराव पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

रत्नागिरी:⭕कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच दक्षता घेण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील छावा प्रतिष्ठानतर्फे कोरोना महामारीच्या काळातही वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून छावा प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य हि परंपरा होती.

ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात. म्हणून सामाजिक भावनेतून आपल्या महापुरुषांचा स्मारकरुपी ऐतिहासिक ठेवा जपून त्या माध्यमातून एक आदर्श पुढच्या पिढीने घ्यावा या उद्धेशाने मालगुंड येथील

*”कवी केशवसुत”* यांच्या स्मारकाची स्वच्छता दिनांक.२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १० ते ०२ या वेळेत करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत खड्डे भरणे, वादळाच्या काळात पडलेली झाडे तोडणे, गवत काढणे,आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

या छावा प्रतिष्ठान आयोजित स्वच्छता अभियानास सहकार्य करण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.सुनिल धावडे,उपाध्यक्ष श्री.सुनिल आग्रे,कार्यध्यक्ष श्री.संतोष आग्रे,खजिनदार श्री.गणेश कांबळे,सचिव श्री समीर धावडे,प्रवक्ता श्री.संगम धावडे,श्री.नंदकुमार धावडे,सल्लागार श्री.मोहन पवार यांनी केलं आहे.

*श्री.नितीन सूर्यकांत रोडे*
*(मीडिया प्रमुख – छावा प्रतिष्ठान रत्नागिरी*
*www.chavapratishthan.com* ….⭕

anews Banner

Leave A Comment