Home Breaking News 🛑 ‘या’ शहरात फासले उपराष्ट्रपतींच्या प्रतिमेला काळे NCP राष्ट्रवादी आक्रमक 🛑

🛑 ‘या’ शहरात फासले उपराष्ट्रपतींच्या प्रतिमेला काळे NCP राष्ट्रवादी आक्रमक 🛑

98
0

🛑 ‘या’ शहरात फासले उपराष्ट्रपतींच्या प्रतिमेला काळे
NCP राष्ट्रवादी आक्रमक 🛑

✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जळगाव, 31 जुलै : ⭕ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन केलेल्या घोषणाबाजीला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले आहेत. गुरुवारी दुपारी याच विषयाचा निषेध नोंदवण्यासाठी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यंकय्या नायडू यांच्या प्रतिमेला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली.

राज्यसभेच्या सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’, अशी घोषणा दिली. त्यावर उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. त्याचा निषेध करण्यासाठी जळगाव शहरातील शिवतीर्थाजवळ एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन त्यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अॅड. कुणाल पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भाजपचे नेते नेहमी जातीपातीचे राजकारण करत आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांनी मते मिळवली. आता मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण भारताची अस्मिता आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रकार कदापी खपवून घेणार नाही, असे यावेळी गफ्फार मलिक आणि अभिषेक पाटील यांनी सांगितले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू असताना सार्वजनिक ठिकाणी आंदोलन केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जिल्हापेठ पोलिसांनी आंदोलनस्थळावरुन अटक केली. त्यानंतर सर्वांची कायदेशीर प्रक्रियेनंतर सुटका झाली.

दरम्यान, नाशिकमध्येही नायडू यांचा निषेध करण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर शिवरायांचा जयघोष करत व्यंकय्या नायडू यांच्या प्रतिमांचं दहन केलं. या घटनेनंतर भाजप कार्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. औरंगाबादमध्येही शिवसैनिकांनी निदर्शने करत उपराष्ट्रपतींचा निषेध केला आहे.

‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणेला उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतल्याने निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टी वाद उ उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा प्रशंसक असून मी माता भवानीचा उपासक आहे. सदस्यत्वाची शपथ घेत असताना कुणीही कोणहीती घोषणा देऊ नये अशी मी सदस्यांना आठवण करून देत होतो. यात अनादर करण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता, असे स्पष्टीकरण राज्यसभा अघ्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिले आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here