• Home
  • 🛑 सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदी पुन्हा आदेश बांदेकर यांची नियुक्ती 🛑

🛑 सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदी पुन्हा आदेश बांदेकर यांची नियुक्ती 🛑

🛑 सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदी पुन्हा आदेश बांदेकर यांची नियुक्ती 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 25 जुलै : ⭕ अभिनेते तसेच सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांची श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. जगभरातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील दादरमध्ये असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा कारभार पुढील तीन वर्षे बांदेकर पुन्हा सांभाळणार आहेत.

आदेश चंद्रकांत बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शुक्रवार, २४ जुलै २०२० पासून पुढील तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. आदेश बांदेकर यांच्याकडे शिवसेनेचे नेतेपदही आहे. श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

छोट्या पडद्यावर भावोजी म्हणून ओळखले जाणारे आदेश बांदेकर गेली १६ वर्ष ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. महाराष्ट्रातील घराघरात जाऊन गृहिणींचा सन्मान करण्याचे काम बांदेकर अव्याहतपणे करत आहेत. त्यामुळे प्रत्येक घरातील वहिनींचे ‘लाडके भावोजी’ असे स्थान त्यांना मिळाले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे ‘होम मिनिस्टर घरच्या घरी’मधून घरूनच ते शूटिंग करतात.⭕

anews Banner

Leave A Comment