• Home
  • 🛑 शिवसेनेच्या वाघिणीने घेतली …..! मराठीतून शपथ 🛑 ✍️नवी दिल्ली

🛑 शिवसेनेच्या वाघिणीने घेतली …..! मराठीतून शपथ 🛑 ✍️नवी दिल्ली

🛑 शिवसेनेच्या वाघिणीने घेतली …..! मराठीतून शपथ 🛑
✍️नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕ राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला.

यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे.

आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पान करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.

भाजपचे खासदार भागवत कराड आणि शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही खासदारांवर राज्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर शरद पवार यांनी हिंदीतून आणि उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली आहे.

तत्पूर्वी खासदार डॉ. भागवत कराड यांनी आपण मराठीतून शपथ घेणार असल्याचे आधीच सांगितले होते. याबद्दल माहिती देताना ते म्हणाले होते,मराठी ही माझी मातृभाषा आहे म्हणून मी मराठीत शपथ घेणार व मराठवाङयाचया विकासासाठी प्रयत्नशील राहू असे डॉक्टर भागवत कराड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते…⭕

anews Banner

Leave A Comment