• Home
  • 🛑 मराठी माझी मातृभाषा आहे….! मी मराठीतूनच शपथ घेणार.- डॉ. भागवत कराड.🛑

🛑 मराठी माझी मातृभाषा आहे….! मी मराठीतूनच शपथ घेणार.- डॉ. भागवत कराड.🛑

🛑 मराठी माझी मातृभाषा आहे….! मी मराठीतूनच शपथ घेणार.- डॉ. भागवत कराड.🛑
✍️नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यसभेच्या चेंबरमध्ये होणाऱ्या या शपथविधी सोहळण्यासाठी 61 सदस्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण लक्षात घेऊन, या कार्यक्रमादरम्यान योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.

यात भाजपचे राज्यसभेचे नवनियुक्त खासदार डॉ. भागवत कराड यांचा देखील समावेश आहे. मार्च महिन्यात त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. कराड हे गोपीनाथ मुंडे गटाचे निष्ठावंत नेते समजले जातात. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि बिल्डर असलेले संजय काकडे यांना डावलून भाजपने कराडांना राज्यसभेची जागा दिली होती.

खासदार डॉ. भागवत कराड हे मराठीतून शपथ घेणार आहेत. याबद्दल माहिती देताना ते म्हणाले,मराठी ही माझी मातृभाषा आहे म्हणून मी मराठीत शपथ घेणार व मराठवाङयाचया विकासासाठी प्रयत्नशील राहू असे डॉक्टर भागवत कराड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले..⭕

anews Banner

Leave A Comment