Home Breaking News 🛑 महाराष्ट्रातील ६ राज्यसभा खासदारांचा…..! शपथविधी संपन्न 🛑 ✍️नवी दिल्ली

🛑 महाराष्ट्रातील ६ राज्यसभा खासदारांचा…..! शपथविधी संपन्न 🛑 ✍️नवी दिल्ली

77
0

🛑 महाराष्ट्रातील ६ राज्यसभा खासदारांचा…..! शपथविधी संपन्न 🛑
✍️नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕ राज्यसभा सदनात आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी खासदारकीची शपथ घेतली. यात नवनिर्वाचित खासदारांमध्ये राज्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड यांचा समावेश होता. यावेळी आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.
मार्च महिन्यात महाराष्ट्रातून या सात जणांची खासदारपदी नियुक्ती झाली. आज त्यापैकी सहा जणांनी शपथ घेतली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांचे नाव पुकारले, पण त्या गैरहजर असल्याचे समजल्यानंतर शरद पवार यांना शपथ घेण्यासाठी बोलवण्यात आले.

काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा झेंडा हाती धरलेल्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पहिल्यांदा खासदारकीची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीची साथ सोडून भाजप प्रवेश केलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीची शपथ घेतली. उदयनराजेंनी इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ असा नारा दिला, पण अशा कोणत्याही प्रकारच्या घोषणा सदनात चालत नाही, हे यापुढे लक्षात ठेवा, अशी आठवण व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना करुन दिली.

दुसरीकडे, मध्य प्रदेशात झालेल्या सत्तापालट नाट्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये सामील झालेले नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही खासदारकीची शपथ घेतली. तर काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचाही शपथविधी झाला

महाराष्ट्राच्या कोट्यातील राज्यसभेच्या सात जागा 2 एप्रिलला रिक्त झाल्या. यात महाविकास आघाडीला 4 जागा मिळणार होत्या. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा निश्चित झाल्यानंतर चौथ्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच पाहायला मिळाली होती. अखेर राष्ट्रवादीने शरद पवारांशिवाय फौजिया खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.

चारही प्रमुख पक्षांमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीवरुन चुरस पाहायला मिळाली होती. भाजप पुरस्कृत रामदास आठवले यांच्याशिवाय पक्षाकडे दोन जागा होत्या. पण चर्चेतील नावांना मागे सारुन उदयनराजे भोसले आणि भागवत कराड यांना तिकीट देण्यात आले….⭕

Previous article🛑 ‘ हेलपिंग हॅण्ड्स यूथ फाउंडेशनने ‘ ठाणे शहरात गरीब समाजांच्या उन्नतीसंदर्भात बर्‍याच कृती केल्या आणि प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत मिळावी ही त्यांची खात्री आहे.🛑
Next article🛑 मराठी माझी मातृभाषा आहे….! मी मराठीतूनच शपथ घेणार.- डॉ. भागवत कराड.🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here