Home Breaking News देशात अमर अखबर अँथुनी एकत्र राहू नये रावसाहेब दानवेंच्या टिकेला युवा काँग्रेसचे...

देशात अमर अखबर अँथुनी एकत्र राहू नये रावसाहेब दानवेंच्या टिकेला युवा काँग्रेसचे प्रतिउत्तर.*

180

*देशात अमर अखबर अँथुनी एकत्र राहू नये रावसाहेब दानवेंच्या टिकेला युवा काँग्रेसचे प्रतिउत्तर.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*

देशात अमर-अकबर-अँथनी एकत्र राहू नये असे भाजपला वाटते अशा शब्दात महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला ट्विटव्दारे उत्तर दिले आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे अमर-अकबर- अँथनीचे सरकार आहे.ते पायात पाय घालून आपोआप पडेल अशा शब्दात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी टीका केली होती. दानवे यांच्या टिकेला सत्यजीत तांबे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले. या देशात अमर अबकर अँथनी कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नये असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आहे. सरसंघचालक गोळवलकर यांनीही ‘बंच आँफ थाँट्स’मध्ये हीच शिकवण दिली होती. बाकी महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.