• Home
  • पुण्यातील येरवडा कारागृहाचे गज कापून…! ५ आरोपी मध्यरात्री फरार…! 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुण्यातील येरवडा कारागृहाचे गज कापून…! ५ आरोपी मध्यरात्री फरार…! 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पुण्यातील येरवडा कारागृहाचे गज कापून…! ५ आरोपी मध्यरात्री फरार…! 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे ⭕ येरवाडा तुरूंगातून ५ कैदी फरार झाल्याची माहिती मिळतीये. पाचपैकी 3 आरोपी हे मोक्कातले आहेत. आज पहाटे ही घटना घडलीये, अशी माहिती कळत आहे.

आज पहाटे तुरूंगाच्या खिडकीचे गज कापून हे कैदी फरार झाले आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली हे आरोपी येरवाडा तुरूंगात अटकेत होते. एकाच रूममध्ये हे आरोपी असल्याने त्यांनी सोबतच पोबारा केला.

पाचव्या मजल्यावर ही खोली होती. रात्रभर हे आरोपी खिडकीचे गज कापत होते. अखेर पहाटे खिडकीचे जग कापल्यानंतर ते खिडकीतून उड्या टाकून पळून गेले. यातील तीन आरोपींविरोधात मोक्काच्या अंतर्गत गुन्हा नोंद होता.

दरम्यान, या पाचही आरोपींविरोधात आता गुन्हा दाखल केला गेला आहे.
दौंड, वाकड, हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपींविरोधात गुन्हे नोंद केला गेला आहे. ज्या तालुक्यातील हे आरोपी होते त्या संबंधित तालुक्यातील पोलिस स्थानकाला याबद्दची माहिती देण्यात आली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत…⭕

anews Banner

Leave A Comment