नायगांव, हिप्परागा (जा.) गावची कन्या कु. मनिषा पाटील कदम यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न –
नांदेड, दि. ८ ; राजेश एन भांगे
हिप्परगा (जा) गावची कन्या कुमारी मनिषाताई विश्वंभरराव पाटील कदम यांची तहसीलदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने .दि.७ रोजी भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, नायगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील शेळगावकर, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, नायगाव पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.वंदना मनोहर पवार,माजी.जि. प.सदस्य गणेश पाटील सावळे, पंचायत समितीचे सदस्य गणेश पाटील उबाळे, डॉ शिवाजी कागडे मनोहर पवार, माजी सरपंच बाजीराव पाटील कदम हिप्परगेकर व गावातील गावकरी मंडळी.