युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिध्दांत चौधरी पुणे 30 जून तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची देहू पुणे येथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस ने पंढरपूर कडे विठ्ठलाच्या भेटीसाठी प्रस्थान झाली या कोरोना व्हायरस महामारी च्या संकटामुळे आषाढी वारी महाराष्ट्र शासनाने रद्द केली व जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी एसटी बसने घेऊन जाण्याचा निर्णय घेतला व आज पालखी पोलीस ताफ्याच्या सुरक्षा मधे प्रस्थान झाली