Home Breaking News युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी 26 जून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा...

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी 26 जून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा मोठा निर्णय हॉटस्पॉट भागावर असणार ड्रोन ची नजर. त्याच बरोबर पुढील तीन दिवसासाठी शहरातील मुख्य बाजारपेठा बंद

133
0

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी 26 जून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा मोठा निर्णय हॉटस्पॉट भागावर असणार ड्रोन ची नजर. त्याच बरोबर पुढील तीन दिवसासाठी शहरातील मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात येतील. पुणे जिल्ह्यात कोरोणा रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत चाललेली आहे पिंपरी चिंचवड मध्ये ही रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे त्यामुळे यापुढे हॉटस्पॉट वर ड्रोन ची नजर असणार आहे पिंपरी-चिंचवड शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणी ड्रोन फिरणार असून लोकांवर नजर ठेवली जाणार आहे असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली नागरिक नियमाचे पालन करत नसल्यामुळे नियमाचे पालन न करणारे नागरिक ड्रोन द्वारे आढळून आल्यास त्या नागरिकां वरती कारवाई करण्यात येईल असे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले ड्रोन ची नजर असणारे भाग आनंदनगर दापोडी नेहरूनगर भाटनगर बुद्ध नगर रमाई नगर साईबाबा नगर दिघी हे परिसर हॉटस्पॉट असल्याने येथे अधिक सतर्कता बाळगून ड्रोन द्वारे नजर ठेवली जाणार आहे त्याच बरोबर पोलिसांचा अधिकचा बंदोबस्तही तैनात केला जाणार असल्याचं हर्डीकर यांनी सांगितलं दरम्यान अनलॉक-1ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्व शहरा मधील लॉक डाऊन मधील शिथिलता आणली जात आहे यामुळे नागरिकांना बाहेर पडणं शक्य होत आहे मात्र त्याच वेळी आता पुणे पिंपरी चिंचवड या भागातील कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे वारंवार सांगूनही बाजारपेठेमध्ये सोशल डिस्टन्सिग आणि आणि सम विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्यासाठी घालून दिलेल्या नियमाचे पालन होत नसल्याने आता अखेर पुढील तीन दिवसासाठी शहरातील मुख्य बाजारपेठा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे… —. युवा मराठा न्यूज प्रतिनिधी…– सिद्धांत चौधरी

Previous article
Next articleपुणे 28 जून मंदिरामागे बसून झोडली दारू व मित्राला केल आयुष्यातून मोकळ, — किरकोळ वादातून दारू पिण्यासाठी बसलेल्या दोन मित्रांनी आपल्याच मित्राचा खून
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here