भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज
देवळा
देवळा तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असून देवळा शहरात प्रथमतःच कोरोनाने शिरकाव केल्याने सोमवारपासून तीन दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले असून व्यापारी बांधव तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.देवळा तालुक्यात मागील महिन्यात दहिवड येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले होते त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर देवळा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता मात्र आज दि.२८ रोजी आलेल्या अहवालात दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत .त्यातील एक १३ वर्षीय रुग्ण असून तो नाशिकला आई बरोबर वास्तव्यास होता मात्र त्याच्या आईला त्रास जाणवू लागल्याने पाच दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावेळी सदर मुलाला खुंटेवाडी ता.देवळा येथील मामाच्या गावी आणण्यात आले होते सदर महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर सदर मुलासह त्याचा मामा, आजी, आजोबा यांचे स्वेब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यात मृत महिलेच्या१३ वर्षीय मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तसेच देवळा नगरपंचायतच्या वसुली विभागाच्या कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने देवळा शहरात खळबळ उडाली असून शहरात पहिल्यांदा कोरोनाने शिरकाव केल्याने तात्काळ सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्वयंस्फूर्तीने देवळा शहरात सोमवार पासून तीन दिवस जनता कर्फ्यु करण्याचे आहवान करण्यात आले आहे.
**देवळा तालुक्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून खुंटेवाडी येथील रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोन्टीन करण्यात आले आहे तर चांदवड येथील कोविड केअर सेंटरला दाखल असलेल्या देवळा येथील रुग्णाच्या पाच नजीकच्या व्यक्तींना कोरोन्टीन करण्यात आले असून त्यांचे स्वेब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत तसेच आरोग्य विभागाच्या वतीने दोन्ही गावांमध्ये प्रत्येक घरातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून दोन्ही गावे कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.– सुभाष मांडगे , तालुका आरोग्य अधिकारी

anews Banner

Leave A Comment