• Home
  • आ. भास्करराव जाधव यांच्याकडून**चिपळूण मतदारसंघातील जनतेसाठी* *आर्सेनिक अल्बम-३० गोळया सुपूर्द* ✍️ चिपळूण ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

आ. भास्करराव जाधव यांच्याकडून**चिपळूण मतदारसंघातील जनतेसाठी* *आर्सेनिक अल्बम-३० गोळया सुपूर्द* ✍️ चिपळूण ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

*🛑 आ. भास्करराव जाधव यांच्याकडून**चिपळूण मतदारसंघातील जनतेसाठी*
*आर्सेनिक अल्बम-३० गोळया सुपूर्द* 🛑
✍️ चिपळूण ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

*⭕सुमारे २० हजार कुटुंबांना होणार लाभ*⭕

रत्नागिरी (चिपळूण):⭕ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी आर्सेनिक अल्बम-३० या प्रतिकारषक्ती वाढविणाऱ्या गोळया आपल्या मतदारसंघातील सुमारे ४० हजार कुटुंबांपर्यंत पोहोचविल्यानंतर चिपळूण मतदारसंघातील जनतेसाठीही उपलब्ध करून दिल्या आहेत. सुमारे २० हजार कुटुंबांना लाभ होईल इतक्या गोळया त्यांनी आज शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. प्रतापराव शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी गुहागर मतदारसंघातील जनतेसाठी विविध प्रकारे मदतकार्य केले. लाॅकडाऊनच्या काळात लोकांपर्यंत अन्नधान्य, औषधे घरपोच देण्यापासून या काळात सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या अनेक छोटया-मोठया समस्या त्यांनी मार्गी लावून सर्वांना सहकार्य केले. कोरोनावर औषध उपलब्ध नसले तरी प्रतिकारशक्ती चांगली असेल तर त्यावर सहज मात करता येते हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबापर्यंत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या आर्सेनिक अल्बम-३० या प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळया वाटप करण्याचा निर्णय घेतला. प्रचंड तुटवडा असतानाही त्यांनी महाराष्ट्र होमिओपॅथिक डाॅक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून या गोळया उपलब्ध करून घेतल्या आणि त्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवल्या.
गुहागर मतदारसंघात गोळया वाटप होत असताना एका कार्यक्रमात सहभागी झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. सचिन कदम, चिपळूण तालुकाप्रमुख श्री. प्रतापराव शिंदे यांनी गुहागरप्रमाणे चिपळूण मतदारसंघातील जनतेसाठीही गोळया उपलब्ध करून दयाव्यात, अशी मागणी आ. श्री. जाधव यांच्याकडे केली होती आणि त्यांनीही गोळ्या उपलब्ध करून देण्याचा शब्द त्यांना दिला होता. त्यानुसार त्यांनी अधिकच्या गोळया उपलब्ध केल्या आणि आज पक्षाच्या त्यांच्या संपर्क कार्यालयात तालुकाप्रमुख श्री. शिंदे यांच्याकडे या गोळया सुपूर्द केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. विक्रांत जाधव हे उपस्थित होते…⭕

anews Banner

Leave A Comment