• Home
  • राज्य परिवहन मंडळाच्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग ✍️ अकोला ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

राज्य परिवहन मंडळाच्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग ✍️ अकोला ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 राज्य परिवहन मंडळाच्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग 🛑
✍️ अकोला ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अकोला :⭕राज्य परिवहन मंडळामध्ये महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य परिवहन मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या महिलेला कामावरून काढण्याची धकमी दिली आणि त्याबदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाविरोधात पीडित महिलेने पोलिसांत गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली आणि शरीर सुखासाठी वारंवार मागणी केली.
कौलखेड रोडवरील वर्कशॉप ऑपरेटर सेक्शनमधील सहायक पदावर काम करणाऱ्या अतुल पोजगे याविरोधात महिला अधिकाऱ्याने खदान पोलिसांत विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.

⭕ तब्बल 18 दिवस सुरू होता छळ ⭕

महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या 2 ते 20 जून प्रचंड छळ केला. वारंवार ऑफिसमध्ये अश्लील चाळे केले. कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आरोपीवर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे….⭕

anews Banner

Leave A Comment