• Home
  • राज्या कर्मचार्‍यांचे निवृत्ती वय ५८ वरुन ६० होण्याची शक्यता! ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

राज्या कर्मचार्‍यांचे निवृत्ती वय ५८ वरुन ६० होण्याची शक्यता! ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 राज्या कर्मचार्‍यांचे निवृत्ती वय ५८ वरुन ६० होण्याची शक्यता! 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕राज्य सेवेतील कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचा राज्य सरकार विचार करत असून याबाबत महिनाअखेरीस निर्णय होेण्याची शक्यता आहे.राज्यात सध्या 16 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी कार्यरत आहेत. यामधील सनदी अधिकारी आणि सफाई कर्मचारी वगळता राज्य कर्मचार्‍यांच्या निवृत्तीचे वय 58 आहे. ते 60 करावे अशी, मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अनेकदा केली आहे. या मागणीवर आपण सकारात्मक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच सांगितले होते.

लॉक डाऊनामुळे राज्याच्या तिजोरीत खणखणाट आहे. कर्मचार्‍यांचे पगार देणेही सरकारला अवघड झाले आहे.
अशा परिस्थितीत सुमारे 3 टक्के कर्मचारी निवृत्त झाल्यास त्यांना भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, गटविमा तसेच इतर देणीपोटी सरकारला लाखो रुपये मोजावे लागतील आणि तिजोरीवर आणखी ताण पडेल. यामुळेच निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचा विचार सुरू झाल्याचे समजते.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे म्हणाले, यासंदर्भात आम्हाला काही कळवलेले नाही. मात्र सरकारने हा निर्णय घेतल्यास सरकारचे आम्ही स्वागतच करू….⭕

anews Banner

Leave A Comment