Home Breaking News पुण्यातील या भागात २९ तारखेला जनता कर्फ्यू ! ⭕ ✍️ वारजे माळवाडी...

पुण्यातील या भागात २९ तारखेला जनता कर्फ्यू ! ⭕ ✍️ वारजे माळवाडी ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) वारजे माळवाडी (पुणे):

136
0

🛑 पुण्यातील या भागात २९ तारखेला जनता कर्फ्यू ! ⭕
✍️ वारजे माळवाडी ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

वारजे माळवाडी (पुणे):⭕ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिवणे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, न्यू कोपरे या गावात येथील सोमवार२९ जून रोजी जनता कर्फ्यू असणार आहे. या दिवशी सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात यावी. त्याचबरोबर, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन नागरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जनता कर्फ्यूच्या काळात सोमवारी फक्त दवाखाना, मेडिकल, सरकारी कार्यालय, दूध विक्री, पेपर वितरण सुरू राहतील.
अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्या व्यतिरीक्त इतर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. असे आवाहन नागरी कृती समितीच्या वतीने नागरिकांना केले आहे. त्याचबरोबर, या चार गावात परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर संबंधित यंत्रणांनी दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. नागरी कृती समितीच्या वतीने जनसेवा उत्कर्ष स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष सुरेश गुजर यांनी बैठक निमंत्रित केली होती.

या बैठकीला उत्तमनगर शिवणे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सारंग रायकर, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य सचिन दांगट, कोंढवे धावडेचे उपसरपंच किरण धावडे, न्यू-कोपरेच्या उपसरपंच मनीषा मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्रिंम्बक मोकाशी, अतुल दांगट, माणिक मोकाशी, शिवसेनेचे संतोष शेलार, अंकुश पायगुडे, भाजपचे अभिजीत धावडे, रमेश धावडे, प्रवीण दांगट, रासपचे उमेश कोकरे, प्रहार संघटनेचे अमोल मानकर, बांधकाम व्यावसायिक महेंद्र दांगट, राहुल धावडे, अतुल धावडे, व्यापारी संघटनेचे कुंतीलाल मुनोत आदी यावेळी उपस्थित होते.

सर्वपक्षीय पदाधिकारी आजी- माजी लोकप्रतिनिधी शिवणे उत्तमनगर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सांगरूण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिल जोशी यांनी यावेळी कोरोना संदर्भात काळजी कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले. या चार गावात मे अखेर पर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या फार कमी होती. या गावांची ग्रीन झोनच्या दिशेने वाटचाल सुरू होती. मागील 15- 20 दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. त्याची माहिती संबंधितांनी उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पंधरकर यांना दिली आहे. जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here