Home Breaking News जून ३० पर्यत कोरोनाचे औषध दुकानात उपलब्ध – राजेश टोपे..! 🛑 ✍️...

जून ३० पर्यत कोरोनाचे औषध दुकानात उपलब्ध – राजेश टोपे..! 🛑 ✍️ मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

72
0

🛑 जून ३० पर्यत कोरोनाचे औषध दुकानात उपलब्ध – राजेश टोपे..! 🛑
✍️ मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

⭕कोरोनवरील उपचाराच्या कोरोनाकरील, रेमेडेसीकीर, फॅबीपीरावीर आणि टॅझीलोझुमा ही प्रभावी औषधे या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यात उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. याशिवाय कंटेनमेन्ट झोनमध्ये नेमका किती जणांना संसर्ग झाला आहे हे शोधण्यासाठी ऍन्टीबॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय सुद्धा सरकारने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

अँटीबॉडीज् चाचण्या करण्याबाबत अनेक वाद असल्याने चाचणी करोना निदानासाठी वापरता येणार नाही असे स्पष्ट करत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) सर्वेक्षणासाठी वापरण्याची परवानगी दिली. त्यावेळी डॉक्टरांसह आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला होता.
परंतु आयसीएमआरच्या आदेशानंतर पालिकेनेही चाचण्या स्थगित केल्या. यालाही आता महिना उलटत आल्यावर सर्वेक्षणासाठी चाचण्या वापरण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.

कोरोना व्हायरसवरील प्रतिबंधात्मक औषध म्हणून होमिओपॅथीक अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांसाठीची मागणी सुद्धा वाढली आहे. आर्सेनिकम अल्बम 30 गोळ्या खरेदी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं नगरसेवकांना त्यांच्या विकास निधीचा वापर करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.होमिओपॅथिक औषधाने कोविड 19 विरूद्ध प्रतिबंधात्मक औषध वापरासाठी शिफारस केली. अर्सेनिक अल्बम 30 या औषध वितरणास महापालिकेनं प्रायोगिक तत्त्वावर परवानगी दिली होती…⭕

Previous articleप्रवाशांच्या खिशाला कात्री; मुंबईत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
Next articleपुण्यातील या भागात २९ तारखेला जनता कर्फ्यू ! ⭕ ✍️ वारजे माळवाडी ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) वारजे माळवाडी (पुणे):
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here