Home Breaking News आदिवासी तरुणाचा धावपटू ते नायाब तहसीलदार प्रवास ✍️ नाशिक ( विजय पवार...

आदिवासी तरुणाचा धावपटू ते नायाब तहसीलदार प्रवास ✍️ नाशिक ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

95
0

🛑 आदिवासी तरुणाचा धावपटू ते नायाब तहसीलदार प्रवास 🛑
✍️ नाशिक ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नाशिक :⭕ अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नाशिकचा दत्ता हरिभाऊ बोरसे हा नायब तहसीलदार झाला आहे. आई-वडील मोलमजुरी करणारे, डोक्यावर व्यवस्थित छप्पर नाही. अशाही परिस्थितीत चिकाटीने शिकत दत्ता बोससे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. राष्ट्रीय धावपटू ते नायब तहसीलदार अशी प्रेरणादायी कहाणी दत्ता बोरसे याची आहे.

दत्ता बोरसे सध्या नाशिकच्या गोविंदनगर परिसरातील एका सोसायटीच्या आवारातील पत्राच्या घरात राहतो. ऊन्ह्यातळ उन्हाचा तडाखा अन् पावसाळ्यात गळके पत्रे. ज्या झाडाखाली आपली झोपडी बांधली तेवढाच काय तो आधार. माणसं राहतात म्हणून हे घर अन्यथा अडगळीच साहित्य ठेवण्याची पत्र्याची जागा.
मात्र, ही झोपडी आता नायब तहसीलदारचं घर म्हणून ओळखली जाऊ लगाली आहे. गेल्या दोनचार दिवसात दत्ता बोरसेवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. त्याचा शोध घेत लोक त्याच्या घरी येतात आणि सारेच अवाकं होत आहेत.
आई-वडिलांच्या कष्टाचं चीज
दत्ता बोरस याचे आई-वडील हरसूल सारख्या दुर्गम आदिवासी पाड्यावरुन रोजगाराच्या शोधत नाशिकला आले. आईने लोकांची धुनी-भांडी केली. बांधकाम साईटवर बिगारी काम केले, तर वडील ही सुरुवातीला बिगारी काम आणि आता गेल्या काही वर्षांपासून एका सोसायटीत सुरक्षा रक्षकाचं काम करत आहेत. त्याच सोसायटीत बांधकाम व्यवसायिकांनी छोटीशी झोपडी बांधलायला परवानगी दिली. पै-पै गोळा करत मुलांना शिकवलं, मुलानं संधीच सोनं केल्यानं आई-वडिलांना आनंद समाधान लपवता येत नाही. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळत आहेत. नायब तहसीलदार या पदावरचं समाधानी न राहता याही पदापेक्षा मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न दत्ता बोरसेने उराशी बाळगलंय…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here